सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा तालुक्यातील अतिदुर्गम अशा पश्चिम भागातील कणकापूर येथे माळरानावर पर्यावरण पूरक अशा तीन ते चार हजार देशी रोपांची लागवड करण्याचा प्रारंभ गुरुवारी (दि.१५) रोजी स्वातंत्र्य दिनी करण्यात आला. तसेच या सर्व रोपांचे वृक्षसंवर्धन, संगोपन करण्यात येऊन भविष्यात याचा पर्यावरणासोबतच गावाला आर्थिक हातभार देखील लागणार असल्याची माहिती उपसरपंच जगदीश शिंदे यांनी दिली.
या मियावाकी वन लागवड प्रकल्प उपक्रमाचा शुभारंभ देवळा पोमोग्रेनेट ऍग्रो फॉर्मर प्रोड्युसर कंपनी व टेक्नो सर्व्हर टीम तसेच कनकापुर/कांचणे ग्रुप ग्रामपंचायत यांच्या वतीने गुरुवारी (दि.१५) ऑगस्ट रोजी करण्यात आला. यात पर्यावरण पूरक देशी झाड आवळा, चिंच, बांबू या झाडांची स्मशानभूमीत व परिसरातील जागेत पोमोग्रेनेट कंपनीचे चेअरमन बापू देवरे, माजी उपसरपंच अनुराधा जैन, छोटू जैन आदी मान्यवरांच्या हस्ते लागवड करण्यात आली.
Deola | देवळा पोमोग्रेनेट ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या वतीने जगातिक पर्यावरण दिन साजरा
याठिकाणी कंपनीच्या गावाच्या मोकळ्या जागेत ३ ते ४ हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीचे सचिव व उपसरपंच जगदिश शिंदे यांनी दिली. यावेळी टेक्नो सर्व्हर च्या हर्षदा सरगर, अनिषा समल, अविनाश ठाकरे, मयूर ठाकरे, तुषार सोनवणे यांनीही वृक्ष लागवड करत पर्यावरणाचे महत्व पटवून दिले. याप्रसंगी संचालक व गुंजाळवाडी पोलीस पाटील योगेश गुंजाळ, सरपंच बारकु वाघ, सदस्य गोविंद बर्वे, दौलत जैन, सुरेश बर्डे, मधुकर पवार, बाळू बकूरे, योगेश गांगुर्डे, संकेत जैन, संजय जैन, मंगळू वाघ, प्रकाश शिंदे, कैलास पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम