सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | येथील कर्मवीर रामरामजी आहेर महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा विज्ञान, वाणिज्य व किमान कौशल्य शाखेचा 100 टक्के तर कला शाखेचा 87.11 टक्के निकाल. विज्ञान शाखेत कु. वेदांत विश्वास पाटील या विद्यार्थ्यांने 84 .33 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तर समीक्षा अशोक साळवे या विद्यार्थीनीने 80.83 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला तर रोशन बाळासाहेब पांढरे या विद्यार्थ्यांने 80 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला.
Deola | खर्डे विद्यालयाचा कला शाखेचा निकाल ८७.०३%; यामिनी शिंदे प्रथम
वाणिज्य शाखेत कु दिशा योगेश शिरसाठ हिने 74.33 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. चेतन किरण देवरे याने 71.83 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला. तर, कु. भूमिका जितेंद्र देवळेकर हिने 70 .33 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. कला शाखेत कु. रुपाली दत्तू आहिरे हिने 89.83 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. कु. जयदीप वसंत गोसावी याने 83.33 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला तर कु. गायत्री युवराज बच्छाव हिने 77.83 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला.
Dindori | दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९९ टक्के
किमान कौशल्य शाखेत कु वृषाली योगेश गुंजाळ हिने 83.33 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला .कु पायल आपाजी बच्छाव हिने 75 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला तर कु आदिती भास्कर कुवर हिने 74.17 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, प्रो. डॉ. मालती आहेर, उप प्राचार्य प्रा बी.के. रौंदळ, श्रीमती एन. वाय. पाटील, आर. एन. निकम, डी. बी. देवरे, एस. ई. बहिरम आदींनी अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम