सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | खर्डे येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १२ वी कला शाखेचा निकाल ८७.०३% लागला असून कु. यामिनी सतिश शिंदे या विद्यार्थिनीने ८०.३३ % गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिने इतिहास विषयात १०० पैकी ९५ गुण मिळवून नावलौकीक मिळविला आहे. मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेला एकुण ५४ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. त्यापैकी ४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर कु. करीना शरद अहिरे हीने ७२.३३ % गुण मिळवून दुसरा व कु. मानसी संजय गांगुर्डे व कु. जयश्री संदीप अहिरे यांनी ७२% गुण मिळवून तिसरा क्रमांक पटकवला आहे.
Deola | केदा आहेर यांची नाफेडच्या राज्य संचालक पदी निवड
कु.चैताली पुंडलिक काळे ७१.१७ % गुण मिळवून चौथा तर, कु. दिव्या पोपट जाधव हीने ७१ % गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अँड. विजय पाटील, प्राचार्य दिलीप रणधीर, उपसरपंच सुनिल जाधव, राहुल देवरे, मधुकर देवरे व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. संजय आहेर, प्रा.श्रीमती सोनवणे एच. एन, व्हि. एस. महाले, के. आर.चौरे यांनी मार्गदर्शन केले.
Dindori | दिंडोरी जनता इंग्लिश स्कुल व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९९ टक्के
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम