देवळा ; देवळा तालुक्यातील माहे जानेवारी 2021 ते डिसेबर -2022 मध्ये मुदत संपणा – या एकुण 26 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे .
सदर कार्यक्रमानुसार( दि .6) रोजी विशेष ग्रामसभा बोलावुन तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिका – यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत अनुसूचित जाती महिला , अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण काढणे बाबत निर्देश दिलेले आहेत . दि .6 रोजी विशेष ग्रामसभेमध्ये प्रारूप रचनेवर आरक्षणाची सोडत काढणेकरीता संबंधित ग्रामपंचायतीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे . तरी प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढणेकरीता नमुद केलेल्या ग्रामपंचायतीची त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या वेळी संबंधित ग्रामपंचायतीच्या कार्यालयात विशेष ग्रामसभा अयोजित करण्यात आली आहे . अशी माहिती तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली .
जुलै २०२१ मध्ये मुदत संपलेल्या व प्रशासक असलेल्या देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायती : विजयनगर, पिंपळगाव, खुंटेवाडी, वाखारी, शेरी, रामेश्वर, सुभाषनगर, सावकी, खर्डे, वार्षी, खडकतळे, गुंजाळनगर, कापशी तर
नोव्हेंबर २०२२ मध्ये मुदत संपणार असणाऱ्या ग्रामपंचायती : फुलेनगर, वासोळ, भऊर, खामखेडा, मटाणे, विठेवाडी, डोंगरगाव, वाजगाव, कणकापुर, श्रीरामपूर, सटवाईचीवाडी, चिंचवे व दहिवड अशा मुदत संपलेल्या 26 ग्रामपंचायतींचा समावेश आहे . दरम्यान ,आरक्षण सोडतीच्या या कार्यक्रमाकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून राहिले असून, आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. होऊ घातलेल्या या निवडणुकांमुळे देवळा तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम