वीजवितरण कंपनीच्या आंदोलनात संघर्ष कृती समिती सहभागी

0
9
खाजगीकरणाच्या विरोधात देवळा येथील वीज वितरण कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलनास बसलेले कर्मचारी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा ; खाजगीकरणाच्या विरोधात वीज वितरण कंपनीच्या राज्यव्यापी आंदोलनात देवळा येथील संघर्ष कृती समिती सहभागी झाली असून ,त्यांनी आज येथील विज वितरण कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास ग्राहकांनी देखील आपला पाठींबा दर्शविला आहे.

खाजगीकरणाच्या विरोधात देवळा येथील वीज वितरण कंपनीच्या प्रवेशद्वारावर आंदोलनास बसलेले कर्मचारी छाया सोमनाथ जगताप

आंदोलनात कृती समितीचे कर्मचारी अजय मेतकर, हिरामण पवार, अभिमण सूर्यवंशी, विक्रांत आहेर, प्रमोद आहेर, दयाराम सोनवणे , नानाजी भदाणे , ललित बागुल रायदि, हिरामण बच्छाव, पी जे सूर्यवंशी , गुलाब आहेर,अविनाश आहेर, अंबादास चव्हाण,संतोष परदेशी, योगेश नंदन ,ललित बागुल,विनोद शेवाळे , सुरेश गायकवाड, बाळकृष्ण आहिरे, प्रदीप देवरे ,समाधान सोळंखे, रामकिशोर देवसिंग ,दिनेश पगारे, संदीप गुंजाळ, संदिप आहेर ,जितेंद्र देवरे ,सागर आहेर आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.

राज्य शासन महावितरण कंपनीचे खाजकीकरण करण्याच्या तयारीत असून, तसे झाले तर याचा फटका सर्वच ग्राहकांना बसणार आहे. खाजगीकरण करण्यात येऊ नये यासाठी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून, आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आंदोलन सुरु असताना देखील वीज पुरवठा सुरळीत सुरु आहे .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here