श्रीरामराव आहेर पतसंस्था निवडणूक ; सहकार व परिवर्तन पॅनलमध्ये अटीतटीची लढत

0
10

देवळा : सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या देवळा येथील श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी सहकार व विरोधी परिवर्तन पॅनल मध्ये सरळ लढत होत असून ,एक अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. मतदानाला अवघे तीन दिवस शिल्लक असतांना संस्थेच्या ज्येष्ठ सभासदांनी एकत्रित येऊन सत्ताधारी पॅनलच्या उमेदवारांना निवडणूक लढवायची तयारी दर्शवली.

यामुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या निशाण्या मिळालेल्या असताना देखील ऐन वेळेस पॅनलची निर्मिती करून सभासदांच्या आग्रहाखातर उमेदवारीसाठी रिंगणात उतरल्याने या निवडणुकीला एक वेगळेच वळण मिळाले आहे. येत्या रविवारी (दि ८) जानेवारी रोजी आहेर पतसंस्थेची निवडणूक होऊ घातली आहे.

“सहकार “पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे ;
सर्वसाधारण गट – विद्यमान चेअरमन पवन अंबादास अहिरराव, डॉ वसंतराव आहेर ,सुधाकर आहेर, दत्तात्रेय देवरे , अरुण खरोटे ,सतीश राणे, विनोद शिंदे, नितीन शेवाळकर.

महिला राखीव गटातून दीप्ती धनंजय आहेर तर मेघा विजय आहेर ,

अनुसूचित जमाती गटातून गोविंदा सोनवणे,

भटक्या विमुक्त गटातून पंडित चंदन यांचा समावेश आहे.

परिवर्तन “पॅनलचे उमदेवार पुढील प्रमाणे – सर्वसाधारण गटातून चंद्रकांत अहिरराव , डॉ अविनाश आहेर, दुलाजी आहेर , भाऊसाहेब आहेर , रजत आहेर, विजय आहेर , डॉ जयवंत भदाणे, संतोष शिंदे.

अनुसूचित जाती जमाती “गटातून विठ्ठल गुजर “इतर मागास” गटातून पंकज आहेर.

महिला गटातून “लताबाई आहेर , वंदना आहेर ,

विमुक्त जाती “गटातून प्रभाकर चंदन यांचा समावेश आहे.

सर्वसाधारण गटातून माजी संचालक शिवाजी शिवमन पाटील हे अपक्ष उमेदवारी करीत असून आपले नशीब आजमावत आहेत.

एकूण १३ जागांसाठी २९ उमदेवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेठी घेण्यावर भर दिला असून , दोन पॅनल मध्ये सरळ लढत होत असल्याने यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे. मतदानाला अवघे तीन दिवस बाकी आहेत. यात सभासदांची भूमिका निर्णायक ठरणार असून , कोणत्या पॅनलची सरशी होते. हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here