देवळा येथील श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी ४४ उमेदवारी अर्ज दाखल

0
42

देवळा : येथील सहकारातील अग्रगण्य अशा श्री रामराव आहेर नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला असून, आज शुक्रवारी दि ९ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी १३ जागांसाठी ४४ उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांनी दिली.

जागा निहाय प्राप्त उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे – सर्वसाधारण जागेसाठी -२७ , अनुसूचित जाती जमाती जागेसाठी -३, महिला राखीव जागेसाठी -७, इतर मागासवर्गीय जागेसाठी -४, भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी -३ याप्रमाणे एकूण ४४ उमेदवारी अर्ज दाखल झाली आहेत.

या दाखल अर्जांची छाननी १२ डिसेंबर रोजी करण्यात येणार असून, माघारिसाठी १३ ते २७ डिसेंबर पर्यंतचा कालावधी आहे . तर निवडणूक व मतमोजणी ८ जानेवारी रोजी होणार आहे. उमेदवारी साठी सभासदांमध्ये रस्सीखेच दिसून येते असल्याने निवडणूक बिनविरोध होणार की नाही याकडे सभासदांचे लक्ष लागून असून, खरे चित्र माघारी नंतर स्पष्ट होईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here