देवळ्यात एकता फ्रेंड सर्कलने पालकत्व गमावलेल्या मुलीस घेतले दत्तक ; नवरात्र उत्सवात नारीशक्तीचा सन्मान

0
39
देवळा : येथील एकता फ्रेंड सर्कलच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेस कुमारिका पूजन व दत्तक मुलीस शालेय साहित्य आणि कपडे भेट देताना मंडळाचे अध्यक्ष योगेश (नानु) आहेर आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : येथील एकता फ्रेंड सर्कलच्या वतीने नवरात्रौत्सवातील आठव्या माळेला कुमारिका पूजनासोबत पालक गमावलेल्या मुलीस दत्तक घेत तिला शालेय साहित्य व कपडे भेट दिले. तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेत खऱ्या अर्थाने नारीशक्तीचा सन्मान व आदर केला. या उपक्रमासाठी शहरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष तथा भाजयुमोचे तालुकाध्यक्ष योगेश (नानु) आहेर यांनी केले.

देवळा : येथील एकता फ्रेंड सर्कलच्या वतीने आयोजित शारदीय नवरात्रौत्सवाच्या आठव्या माळेस कुमारिका पूजन व दत्तक मुलीस शालेय साहित्य आणि कपडे भेट देताना मंडळाचे अध्यक्ष योगेश (नानु) आहेर आदी (छाया – सोमनाथ जगताप )

येथील एकता फ्रेंड सर्कलच्या वतीने दरवर्षी शारदीय नवरात्रौत्सव उत्साहात साजरा होतो. यावर्षी मुली व महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. आठव्या माळेचे औचित्य साधत देवीचे प्रतीक असणाऱ्या कुमारिकांचे पूजन हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कुमारिकांनी विविध देवदेवतांची वेशभूषा करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी महिलांनी या कुमारिकांना भेटवस्तू देत त्यांचे पूजन केले.

या कार्यक्रमादरम्यान एकता फ्रेंड सर्कलमधील दिवंगत शैलेश वाडेकर यांची मुलगी धनश्री हिला या मंडळाने दत्तक घेत तिला शालेय साहित्य व कपडे भेट दिले. तसेच तिच्या पुढील शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. या मंडळाने यापूर्वीच धनश्रीच्या नावावर एक लाख रु.टाकले आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचेही यासाठी सहकार्य लाभत आहे.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष योगेश(नानु) आहेर, भूषण संकलेचा, कपिल खरोटे, राहुल पवार, विकी सोनवणे, हर्षद मेतकर, सुमित शिवदे, अशोक आहेर, आहेर मंडम, डांगरे मॅडम, रुपेश शिवदे, किशोर शिवदे, रोहित शिवदे, महेश मेतकर, सुनील सांबरे, वैभव शिवदे, रितेश शिवदे, नरेश चव्हाण, सनी मोरे, अक्षय शिवदे, दिनेश गुजरे, सुनील सांबळे, सोहन गोयल, दिपक गुजरे, धनंजय गांगुर्डे, प्रवीण चंदन ,विकी पवार, रुपेश शिवदे आदींनी संयोजन केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here