Deola | ब्राईट बिगिनिंग इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

0
54
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा येथील ब्राईट बिगिनिंग इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोमवार (दि.22) रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रा.डॉ.मालती आहेर अध्यक्षस्थानी होत्या. ब्राईट बिगिनिंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका एकता आहेर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर ब्राईट बिगिनिंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका लिना अहिरराव यांनी (गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः) हा गुरुमंत्र सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील गुरूंचे महत्त्व समजावून सांगितले. सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ब्राईट बिगिनिंग इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. शिक्षिका कविता पवार यांनी आभार मानले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here