Deola | श्री.शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल येथे शिक्षण सप्ताहांतर्गत शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन

0
39
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा एज्युकेशन सोसायटी संचलित येथील श्री.शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल येथे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या आदेशान्वये शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत असून मंगळवारी (दि.23) रोजी शासनाने ठरवून दिलेला मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस या विषयान्वये मुख्याध्यापिका सुनिता पगार, पर्यवेक्षक निवृत्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने विविध उपक्रम राबविण्यात आलेत.

Deola | व्हीकेडी स्कूलमध्ये शिक्षण सप्ताहाचे आयोजन

सकाळी शालेय परिपाठाच्या वेळी सर्व शिक्षकांना निपुण प्रतिज्ञा देण्यात आली. विद्यालयातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी निरीक्षर राहिल्यामुळे कोणत्या कोणत्या अडचणी निर्माण होतात. कुटुंबावर वाईट परिस्थिती निर्माण होते. हे साक्षरतेवर आधारित नाटकामधून संदेश दिला. तसेच अध्यापनात रुची निर्माण व्हावी व अध्यापन परिणामकारक व्हावे यासाठी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य तयार केले. त्याचे प्रदर्शन भरवण्यात येऊन इतर सर्व विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग कसा होईल हे समजवण्यात आले.

Deola | एसकेडी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘टीएलम दिवस’ साजरा

मूलभूत ज्ञानाचा उपयोग कुठे कसा होतो व करावा तसेच पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानाच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि आनंददायी अध्यापनासाठी केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांच्या संदर्भाने आंतरक्रियात्मक अध्ययन सत्राचे आयोजन करण्यात आले याबद्दल श्रीमती पगार यांनी मार्गदर्शन केले. सदर उपक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक परीक्षेत घुगे, किशोर पगार, शैलेश खैरनार, यशोमती अहिरे, मेघा पवार व इतर सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेत व आजचा दुसरा दिवस विविध उपक्रमासह यशस्वीरित्या साजरा करण्यात आला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here