सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | एसकेडी चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक संचलित, व्ही.के.डी.इंग्लिश मिडियम स्कूल, अँड ज्युनिअर कॉलेज, भावडे. ता. देवळा येथे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ अंतर्गत ‘शिक्षण सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या शिक्षण सप्ताहात शासनाने निर्धारित केलेले उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये इयत्ता पहिली ते दुसरी, इयत्ता तिसरी ते पाचवी, इयत्ता सहावी ते दहावी, व इयत्ता अकरावी ते बारावी. असे गट तयार करण्यात आले.
Deola | एसकेडी इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘टीएलम दिवस’ साजरा
पहिल्या दिवशी कार्डशिट व बांबूच्या काड्यांपासून विविध शालेय वस्तूंची निर्मिती करण्यात आली. दुसऱ्या दिवशी गणिताविषयी सांकेतिक कोडे ज्ञानावर भर देण्यात आला व त्यात अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती करण्यात आले. वरील कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य एन.के. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हा शिक्षण सप्ताह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या सहभागातून पार पाडण्यात येणार आहे. या शैक्षणिक सप्ताहाप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय देवरे, सचिव सौ. मीना देवरे यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम