देवळा : विद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या पालक संघाची भूमिका ही विद्यार्थी विकासात महत्वाची असल्याचे प्रतिपादन माजी उपसरपंच सतीश गुंजाळ यांनी केले. देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयात पालक शिक्षक संघाची सभा पार पडली यावेळी ते बोलत होते. विद्यालयात सन २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षासाठी पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालक शिक्षक संघाची नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी मुख्याध्यापक प्रतिभा सागर यांची तर, उपाध्यक्ष पदी सतीश विश्राम गुंजाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
Deola | जिजामाता कन्या विद्यालयात विद्यार्थिनींचा गुणगौरव सोहळा संपन्न
उर्वरित कार्यकारणी पुढीलप्रमाणे – संजय पाटील (सचिव), महेंद्र अशोक आहेर(सह सचिव), सदस्य म्हणून सुनिल हिरे, मिनाक्षी निकम, जशबिन तांबोळी, मानसी वाघमारे, योगिता चव्हाण, भाग्यश्री बागुल, जयेश आहेर, योजना पगार, राजेंद्र जाधव, राजेंद्र पवार, दिलीप आहेर यांची निवड करण्यात आली. पर्यवेक्षक के.एम.खोंडे यांनी प्रास्ताविक केले तर एस.एन.आहेर यांनी अहवाल वाचन केले. विद्यालयाच्या प्रगतीचा उंचावणारा आलेख बघून पालकांनी समाधान व्यक्त केले. विद्यालयाने मुख्यमंत्री ‘माझी सुंदर शाळा’ उपक्रमात द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल कौतुक करण्यात आले. यावेळी विद्यार्थी हिताच्या अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. याप्रसंगी योगेश आहेर, रोशन आहेर, अमोल पोलादे, एल.एस.करवंदे, डॉ.झांबरे, पंकज जाधव, योगिता ठाकरे, भारत पवार यांसह पालक शिक्षक उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम