Congress | तिकिट जाणार अशी चर्चा होताच धडकी भरली; इगतपुरीच्या आमदारांची ‘मुंबईवारी’

0
52
Nashik News
Nashik News

Congress | नाशिक: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सहा ते सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे बोलले जात होते. यावर पक्षश्रेष्ठींनी उघड नाराजी बोलुन दाखवत आमदारांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान. या फुटीर आमदारांबाबत अहवाल पक्षाच्या हायकमांडकडे पाठवण्यात आला असून, या आमदारांना विधानसभेला (Vidhansabha Election 2024) तिकीट न देण्याची कारवाई करण्याचे आदेश हायकमांडने नाना पटोले यांना दिल्याची माहिती समोर आली होती.

कारवाईच्या चर्चेनंतर खोसकर तात्काळ मुंबईला रवाना 

यात पाच आमदारांची नावं समोर आली असून, या आमदारांवर क्रॉस व्होटिंगचे आरोप केले जात आहेत. याअ पाच आमदारांमध्ये नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांचेही नाव घेतले जात असून, कारवाईची चर्चा सुरू झाल्याने आज खोसकर हे तडकाफडकी मुंबईला रवाना झाले आहेत.

Igatpuri Constituency | आमदार खोसकरांच्या अडचणीत वाढ; पक्षानंतर आता स्थानिकांनाही ‘ते’ नकोसे..?

मुंबईत ते आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेणार असून, कारवाईबाबत चर्चाही करणार आहेत. एकीकडे पक्षाने कारवाईच्या कचाट्यात सापडले असून, दुसरीकडे स्थानिक भूमीपुत्रांनीही आयात आमदाराला पाडणार असल्याची भूमिका घेतल्याने आमदार हिरामण खोसकर यांची सध्या चांगलीच कोंडी झाल्याचे दिसत आहे. (Congress)

नाशिकच्या इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपण क्रॉस व्होटिंग केली नसून आपल्यावर खोटे आरोप केले जात असल्याचा दावा खोसकर वारंवार करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी स्पष्टीकरण देताना नाना पटोले यांना इशारा देत नाना पटोले यांच्यामुळे पक्षातील अनेक आमदार असल्याचा दावा केला होता. यानंतर आता कालच्या बातम्यांमुळे पुन्हा एकदा हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) हे चर्चेत आले आहेत.

Congress |  तिकिट नका देऊ, पण खोटे आरोप करू नका

तर, नाना पटोले (Nana Patole) यांना भेटून आपली बाजू  मांडणार असल्याचे हिरामण खोसकर म्हणाले. ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग (Cross Voting) केले आहे. त्यांची नावं उघड करा. मला विधानसभेचे तिकिट नसेल द्यायचे तर नका देऊ. पण खोटे आरोप करून बदनामी करू नका, अशी भूमिका आमदार हिरामण खोसकर यांनी घेतली आहे.

Congress Cross Voting | काँग्रेसकडून ‘त्या’ आमदारांचा कारवाई; नावं जाहीर करत पत्ता कट..!

क्रॉस व्होटिंगचे आरोप असलेले आमदार..?

  1.  सुलभा खोडके- अमरावती
  2. झिशान सिद्दीकी- वांद्रे पूर्व
  3. हिरामण खोसकर- इगतपुरी (अ.जा)
  4. जितेश अंतापूरकर- देगलूर (अ.जा)
  5. मोहन हंबर्डे- नांदेड दक्षिण

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here