सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा येथील आहेर विद्यालयाचे कला शिक्षक भारत पवार यांना महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भारत सरकार सूक्ष्म लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालय या विभागात नोंदणीकृत संस्था महाराष्ट्र राज्य “टॅलेंटकट्टा”आयोजित १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पत्रकार भवन पुणे येथे ‘सह्याद्री रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कला शिक्षक पवार यांना याआधी समाज, संस्कृती, कलेचे संवर्धन व लोकशाही विचारांना एकत्र करणारा आणि जगण्याला ध्येय बनवणाऱ्या अनेक राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
Deola | कृषी तज्ञ रामदास पाटील यांच्या हस्ते आहेर महाविद्यालयात कृषी मार्गदर्शन केंद्राचे उदघाटन
यावेळी सिने अभिनेत्री आर्या घारे, पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक नितीन पाटील, प्रसिद्ध लेखक डॉ.संतोष मचाले, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपक जाधव व टॅलेंटकट्टा टीम उपस्थित होती. याबद्दल देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य डॉ. हितेंद्र आहेर, सचिव प्रोफेसर डॉ.सौ.मालती आहेर, प्रशासकीय अधिकारी प्रा. बापू रौंदळ, मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा सागर, पर्यवेक्षक कौतिक खोंडे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, यांच्या वतीने कलाशिक्षक भारत पवार यांचे अभिनंदन करण्यात आले.
Deola | आहेर महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने ‘कारगिल विजय दिवस’ साजरा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम