सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा येथील कसमादे करियर व स्पोर्ट अकॅडमीच्या वतीने कसमादे परिसरातील तरुणांना व तरुणींना भारतीय सुरक्षा दलामध्ये व पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी शुक्रवारी दि.२० रोजी मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. यावेळी बारामती येथील सह्याद्री करियर अकॅडमीचे चेअरमन उमेश रूपनवर सपत्नीक उपस्थित होते. या करियर मार्गदर्शनासाठी नाशिक येथील सुमन कन्स्ट्रक्शनचे चेअरमन व माजी सैनिक जयेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी उमेश रुपनवर यांनी नव तरुणांसाठी व तरुणींसाठी सैन्य दलामध्ये परीक्षेची तयारी व फिजिकल पात्रतेची तयारी, विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेच्या परीक्षेसाठी अभ्यास कसा करावा अभ्यास करण्याची व फिजिकल पात्रतेची प्रणाली, भारतीय सुरक्षा दलामध्ये किंवा महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मेहनत करण्याची जिद्द नेहमी बाळगून ठेवावी.
Deola | पिंपळगाव (वा.) विद्यालयात संत गाडगेबाबा यांना अभिवादन
एक वेळा किंवा दोन वेळा अपयश आल्यानंतरही त्याच परीक्षेची परिश्रम करून अभ्यास करून परत यशस्वी होण्यासाठी जिद्द सोडू नये, आपले यशस्वी करिअर घडवून आणावे, आपल्या परिवाराशी गावाचे, मार्गदर्शकाचे व जिल्ह्याचे नाव उंच शिखरावर पोहोचवावे असे मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी या अकॅडमीला महाराष्ट्र पोलीस भरतीपूर्व तयारीचे स्वतः लिहिलेले पुस्तक भेट दिले. याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अशोक आहेर, प्रा. डी. के आहेर , डॉ. अनिल चव्हाण, युवराज आहेर, नगरसेवक संतोष शिंदे, प्रचार्य संजय आहेर, डॉ. वसंतराव आहेर, संदीप पवार आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कसमादे करिअर व स्पोर्ट्स अकॅडमी पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. माजी सैनिक प्रविण बोरसे यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम