सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | मविप्र च्या पिंपळगाव (वा) येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कर्मवीर अँड. विठ्ठलराव हांडे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर अॅड. हांडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संगीता आहेर होत्या. व्यासपीठावर प्राचार्य संगीता आहेर, प्रभारी पर्यवेक्षक अशोक खैरनार, चंद्रशेखर चव्हाण, महेंद्र बच्छाव, दिनेश जाधव, सुभाष भोये, सुनिता आहेर, वैशाली निकम, जयश्री बिरारी, रोहिणी आहेर, सरोज जाधव आदी उपस्थित होते.
Deola | विठेवाडी येथे शेतकरी संघटनेचे संस्थापक कै. शरद जोशी यांची नववी पुण्यतिथी साजरा
याप्रसंगी सांस्कृतिक मंडळाचे प्रमुख रवींद्र निकम यांनी कर्मवीर अॅड. विठ्ठलराव हांडे यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देत मविप्रच्या शिक्षण संस्थेसाठी अॅड. हांडे यांनी दिलेले योगदान त्याचप्रमाणे विधान परिषद विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या कार्याची ओळख यानिमित्ताने करून देत त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. प्राचार्य आहेर यांनी हांडे यांनी केलेली जन आंदोलने, संस्थेसाठी केलेला त्याग, शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता संस्थेत त्यांनी आणली आणि संस्था मोठी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता असे सांगितले. या प्रसंगी सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक हेमंत पवार यांनी केले तर आभार पृथ्वीराज सूर्यवंशी यांनी मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम