देवळा : खर्डे ता देवळा परिसरात आज पोलिसांनी अवैद्य गावठी दारू अड्ड्यांवर छापा मारून दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन नष्ट केले. धडक कारवाईमुळे सर्रास उघड्यावर दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी ग्रामीण भागात अवैद्य रित्या सुरु असलेल्या सर्वच व्यवसायांवर टाच आणली असून , त्यांच्या आदेशानुसार देवळा पोलिसांनी तालुक्यात सुरु असलेल्या अवैद्य दारू विक्री अड्ड्यांवर छापे मारून कारवाईला सुरुवात केली आहे.
सद्या मटका व्यवसाय बंद असला तरी गावागावांत अवैद्य गावठी दारू बरोबरच देशी विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय फोफावला आहे. यामुळे बहुतांश गावांत दारू मुळे कायदा व सुव्यवस्था ढासळण्याचे प्रमाण देखील वाढले आहे . आज तालुक्यातील खर्डेसह वार्शी ,हनुमंतपाडा या ठिकाणी पोलिसांनी गावठी दारू अड्ड्यांवर छापे मारून रसायने उध्वस्त केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून , विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. तालुक्यात राज्य मार्गावरील तसेच गावागावात छोट्या मोठया हॉटेलात देशी विदेशी दारू मिळत आहे.
या व्यवसायातून बेरोजगारांना दोन पैसे मिळतात. पण या व्यवसायाला विरोधही तेवठाच आहे. सद्या पोलिसांनी धाडसत्र सुरु केल्याने, तूर्तास तरी या व्यावसायिकांवर थोड्या फार प्रमाणात का होईना आळा बसला हे निश्चित . मात्र हा व्यवसाय पूर्णतः बंद करण्यात यावा ,अशी मागणी महिला वर्गाकडून जोर धरू पहात आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम