Deola | देवळ्यातील अजब चोरीची चर्चा; रात्री चोरी अन् पहाटे चोराने आधारकार्ड, पासबुक परत केले

0
152
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | देवळा शहरालगतच्या उपनगरात चोरीच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. येथील वाजगाव रोडवरील अनिल केशव आहेर यांच्या लग्नघरी सोमवार (दि.२२) रोजी रात्री चोरी झाली असून यात अज्ञात चोरट्याने मोठ्या लगेज बॅगमधील पर्स, सोन्याचे दागिने, साड्या व इतर किमती वस्तू असा अंदाजे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे या चोरट्याने पहाटे पुन्हा येत सदर पर्समधील आधारकार्ड व बँकेचे पासबुक दाराला लावून देत परत केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.देवळा येथील वाजगाव रोडवरील अनिल केशव आहेर यांच्या घरी लग्नाच्या आदल्या दिवशीचा मांडव व हळदीचा कार्यक्रम असल्याने येथे नाशिक येथील तिलोत्तमा पंकज गुंजाळ ह्या मुक्कामी होत्या.

Deola Crime | देवळ्यात भरदिवसा घरफोडी; चोराने रोख रक्कम व सोने केले लंपास

मात्र हळदीच्या कार्यक्रमानंतर त्यांच्या सामानाच्या लगेज बॅगची शोधाशोध केली असता ती अज्ञात चोरट्याने गायब केल्याचे लक्षात आले. या बॅगमधील पर्समध्ये जवळपास एक तोळ्याचे सोन्याचे दागिने, किमती साड्या व इतर साहित्य होते. यामुळे एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार तिलोत्तमा गुंजाळ यांनी देवळा पोलिसांत दिली.

रात्री उशिरापर्यंत तपास केला पण यश आले नाही. मात्र सदर चोरट्याने पहाटे केव्हातरी या पर्समधील तिलोत्तमा गुंजाळ यांचे आधारकार्ड व बँकेचे पासबुक घराच्या दाराला लावलेले आढळून आल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आले. याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Deola Crime | देवळ्यात चोरांचा सुळसुळाट; भरदिवसा चोरट्यांनी सेवानिवृत्त शिक्षकाला लुबाडले


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here