
Deola : देवळा शहरात काल मंगळवारी(२४) रोजी रात्री दोन ठिकाणी घरफोडी व एक दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली आहे. यामुळे उपनगरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून, पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला असून या घटनेबाबत देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

देवळा कळवण रोड वरील उपनगरात गेल्या तीन चार महिन्यांपूर्वी घरफोडी झाली होती. ही घटना ताजी
असतांनाच मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी दिनेश देवरे व संजय अलई यांच्या बंद घराचे कुलूप कोयंडा तोडून आता मध्ये प्रवेश केला आहे . या घरातून नेमके काय चोरीस गेले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी याच परिसरात राहणारे किरण आहेर यांची होंडा युनिकॉन (एमएच 41 ए सी 8077) ही दुचाकी चोरीस गेली आहे .
देवळा शहरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. देवळा शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. दरम्यान देवळा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदासह इतर पोलीस कर्मचारी संख्या अपुरी असल्याने सतत घडणाऱ्या विविध प्रकारच्या घटना व घटनास्थळी दाखल होण्यास होत असलेला विलंब पाहता याठिकाणी नवीन पोलीस निरीक्षक व इतर पोलीस शिपाई ,हवालदार यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम