देवळा ; येथील देवळा बाजार समितीच्या नवीन मार्केट यार्डातून ५० क्विंटल मक्याचे ८२ कट्टे चोरीस गेल्याने मका व्यापारी दिनकर गुंजाळ यांचे जवळपास १ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ,गुंजाळ यांनी देवळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि , देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे भुसार मालाचे खरेदीदार व्यापारी दिनकर केदा गुंजाळ हे मका खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात . त्यांनी खरेदी केलेला मका बाजार समितीच्या नवीन नवीन मार्केट यार्डात असतो. दि २४ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास यातील भरून ठेवलेले ८२ कट्टे( आजच्या बाजार भावप्रमाणे १ लाख १० हजार रुपये ) किमतीचा जवळपास ५० क्विंटल मका अज्ञात चोरटयांनी चोरून नेला.
मार्केट यार्डातून आपला मका चोरीस गेल्याचे लक्षात आल्यावर गुंजाळ यांनी बाजार समितीकडे तक्रार केली . यानंतर सचिव माणिक निकम यांनी देवळा पोलिसात या घटनेची तक्रार दाखल केली असून , यात त्यांनी उभा आधी मार्केट यार्डात लिलावासाठी उभे असलेल्या ट्रॅक्ट्ररांची बॅटरी तसेच इतर सामान चोरीस गेल्याचे नमूद केले आहे . व आत्ता मक्याची चोरी झाल्याने पोलिसांनी या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा ,अशी मागणी केली आहे .
मार्केट यार्डात वारंवार अशा घटना घडत असल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून , मका चोर सीसी टीव्ही कॅमेरात कैद झाले असून , पोलिसांनी याची कसून चौकशी करावी . व कारवाई करण्यात यावी अशी मागणी सचिव माणिक निकम यांनी केली आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम