देवळा : सध्या नाशिक जिल्ह्यात अवैध धंदे चालकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्याला कारणही तसेच आहे. खाकी आता सक्रिय झाली असून भल्या भल्यांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या डोळ्यासमोर सुरू असलेले अवैध धंदे आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत. नाशिक पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण यांचे आदेशान्वये जिल्हाभरात कारवाई सुरू असून याच कारवाईचा भाग म्हणून देवळा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी तालुक्यात एकाच दिवशी पाच ठिकाणी धाडी टाकत धडाकेबाज कारवाई केल्याने अवैद्य धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले तर सर्वसामान्य जनतेने मात्र या कारवाईचे स्वागत केले आहे.
या बाबत देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवळा पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंदया बाबत गोपनीय रित्या माहिती घेवुन सहा. पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, सहा.पो.उप.निरी विनय देवरे, पो.ना. भारकर सोनवणे, म.पो.ना. ज्योती गोसावी यांच्या टीमने तालुक्यात एकाचा दिवशी पाच ठिकाणी धाडी टाकत कारवाई केली.
करवाई दरम्यान पिंपळगाव वाखारी येथील एका पान स्टॉल वरून १ हजार ७३१ रू चा विवीध प्रकारचा महाराष्ट्रात बंदी असलेला पानमसाला गुटखा, खारीपाडा येथून १हजार ५० रू किंमतीच्या देशी क्वॉर्टर, उमराणे येथील आदिवासी वस्ती येथून १ हजार किंमतीची गावठी दारू, तसेच भऊर येथील नेपाळी वस्ती येथून १ हजार रुपये किंमतीची गावठी दारू, देवळा – कळवण रोड वरील एका हॉटेल मधून ९ हजार ६५० रू रोख रूपये व जुगाराचे साहीत्य असा एकुन १४ हजार ४३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दि. ३० रोजी झालेल्या या कारवाईमुळे अवैद्य धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले तर यापुढे देखील कारवाई चा बडगा सुरूच असेल असे शिरसाठ यांनी सांगितले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम