देवळा : देवळा शहर कायमच सुशक्षित शहर म्हणून ओळखले गेले मात्र सद्या या शहरात भामट्यांचे प्रमाण वाढले असून बाईक व मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शहरातील वाहन चोर व आठवडे बाजारातील मोबाईल चोर यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा या मागणीचे निवेदन देवळा नगरपंचायत गटनेते संतोष शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली देवळा पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना दिले.
देवळा तालुक्यातील व मुख्यतः देवळा शहरात व गेल्या महिन्याभरापासून वाहन चोरीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढले असून, जनता या वाहन चोरीमुळे त्रस्त झाली आहे. तसेच आठवडे बाजारात देखील वारंवार मोबाईल चोरीच्या घटना घडत असतात. तरी मोबाईल व वाहन चोर यांच्या मुसक्या आवळून त्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रांतिक सदस्य योगेश आहेर, जितेंद्र आव्हाड युवा मंच चे अध्यक्ष सचिन सुर्यवंशी, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पवार, शहर अध्यक्ष दिलीप आहेर, मुन्ना आढाव, भाऊसाहेब वाघ, दिलीप मेतकर, मनोज गुजरे, मयूर सोनवणे, दत्तू आहेर, गणेश आहेर, बंडू आहेर, भिला सोनवणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम