देवळा: येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळा अंतर्गत हर घर झेंडा या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे वाटप करून करण्यात आली.
या महोत्सवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भारतीय नागरिकांच्या हातात राष्ट्रध्वज घेऊन त्याचा एक विक्रमी फोटो अल्बम तयार करून त्याची नोंद या अमृत महोत्सवाच्या स्वातंत्र्यदिनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करणार आहे . या उपक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा हातात ध्वज धरलेला फोटो अपलोड करून करण्यात आलेली आहे.
देवळा महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर यांचा हातात ध्वज धरलेला फोटो महाविद्यालयात कार्यक्रमाची सुरुवात करताना अपलोड करण्यात आला. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी स्वयंसेवक यांनीही आपला सहभाग नोंदवला.
संस्थेच्या श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल व जिजामाता कन्या विद्यालयातील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व विद्यार्थी यांनीही या उपक्रमात भाग घेतला. आत्तापर्यंत महाविद्यालयातर्फे ७७१ फोटो अपलोड करण्यात आले असून यापुढेही १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत हा उपक्रम चालू ठेवण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. डी. के. आहेर व महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सतीश ठाकरे यांनी दिली.
या उपक्रमात जास्तीत जास्त सहभाग घेण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी.के रौंदळ, कार्यक्रम अधिकारी डॉ.जयमाला चंद्रात्रे प्रा.राकेश घोडे, डॉ.सुनील आहेर स्वयंसेवक श्वेता शिंदे, मिताली जाधव मानसी जाधव, गोरख कारवार, भरत कांदळकर प्रयत्न करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम