देवळा एज्युकेशन सोसायटीच्या दर्शनी फलकावर साकारले इकोफ्रेंडली चित्रगणेशा

0
14

देवळा प्रतिनिधी : गणेश चतुर्थी किंवा “विनायक चतुर्थी” हा सर्वात पवित्र हिंदू सणांपैकी एक आहे. हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते, व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो.

या सणात गणपती बाप्पा त्यांच्या भक्तांच्या घरी विराजमान होतात. आजकाल पर्यावरणाच्या समस्येत भर घालत, मूर्ती जड पेंट्सने सजवल्या जातात ज्या हानिकारक असतात आणि ज्यामुळे पाण्यातील वनस्पती आणि प्राणी नष्ट होण्याच्या प्रक्रियेत देखील भर पडते. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी पर्यावरणपूरक चित्रगणेशा आमच्या देवळा एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या दर्शनी फलकावर कलाशिक्षक भारत पवार यांनी रंगीत खडूच्या साहाय्याने उभेउभ चौदा विद्या आणि चौसष्ठ कलेचा अधिपती श्रीचित्रगणेशा साकारले आहे. दहा दिवस रोज वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते, उपस्थितीत या श्रीचित्रगणेशाच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते.

पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्देशाने इको-फ्रेंडली चित्रगणेशा हा सर्वोत्तम पर्याय आहे. गणपतीची मूर्ती 10 दिवसांनी पाण्यात विसर्जित केली जात असल्याने, पाण्याची गुणवत्ता खराब होणार नाही. याची काळजी म्हणून इको-फ्रेंडली चित्रगणेशा कधीही चांगले आहे. यानिमित्ताने देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय प्राचार्य श्री.हितेंद्र बापूसाहेब आहेर, देवळा तालुक्याचे नायब तहसीलदार मा.बनसोडे साहेब, देवळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री.सतिश बच्छाव साहेब, देवळा एज्युकेशन सोसायटीच्या प्रशासकीय अधिकारी मा.प्रो.डॉ.सौ.मालतीताई आहेर मॅडम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. तसेच परिसरातील गणेशभक्त यांनी आनंद व्यक्त केला आहे.

या उपक्रमासाठी मा.मुख्याध्यापक श्री.डी.आर.आहेर सर, मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा सागर मॅडम, पर्यवेक्षक, समुपदेशक, वृक्षमित्र डॉ.सुनील आहेर सर, श्री.निकम सर, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here