देवळा ; येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयात ‘कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश अमानग द लअरर्न्स’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली . प्राचार्य हितेंद्र आहेर अध्यक्षस्थानी होते.

समन्वयक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.जालिंदर कडू यांनी प्रास्ताविक व कार्यशाळेची भूमिका मांडली. एक दिवसीय कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे प्राचार्य पांडुरंग भाबड , (इगतपूरी कॉलेज) व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. बिन्नोर ( के टी एच एम कॉलेज) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले.
पहिले पुष्प गुंफताना डॉ भाबड यांनी इंग्रजी विषयात तज्ञ होणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थी हा एक सुजाण नागरिक होऊन पिढी घडवणारा असतो. इंग्रजी प्राध्यापकांनी इंग्रजी शिकवत असताना विविध प्रकारच्या एक्सपेरीमेंट केल्या पाहिजे.शिक्षकांबरोबर संवाद साधत विद्यार्थ्यांना इंग्रजी का बोलता येत नाही याविषयी संशोधन करून त्यासंबंधीतील उपाययोजनाही केल्या पाहिजे दुसऱ्या व्याख्यानात डॉ . बिन्नोर यांनी इंग्रजी शिकत असताना इ लरनिंग आणि तिचे महत्व सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांना खेळातून इंग्लिश कसे शिकवता येईल याविषयीचे त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले . कार्यशाळेसाठी प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीमती एम. एच. आहेर,उप प्राचार्य व्ही. एम.जोशी , आय क्यू ए सी समन्वयक डॉ. बनसोडे , एस टी पाटील यांच्यासह तालुक्यातील विविध शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीमती पवार मॅडम केले व प्रा.हर्षाली निकम यांनी आभार मानले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम