Deola | मुंबई-आग्रा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; बसमधील सात प्रवासी जखमी 

0
18
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्गावरती राहुड घाटाच्या पायथ्याजवळ सोमवार (दि.१६) रोजी चार वाजेच्या दरम्यान चार वाहनांचा भीषण अपघात झाला. त्यात बस वाहकासह सात प्रवासी जखमी झाले असून, रस्ता ओलांडत असलेल्या १३ मेंढ्या चिरडल्या गेल्या. विशेष म्हणजे या अपघातात दोन बसेसचा समावेश आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सोमवार (दि .१६) रोजी चार वाजेच्या दरम्यान राहुड घाटाच्या पायथ्याशी दोन बसेस, एक विटा भरलेला तर दुसरा कांद्याचा ट्रक अशा चार वाहनांचा अपघात झाला. त्यात ठाणे डेपोची बस (एमएच२० बीएल ३७२७) चा अतीवेग असल्यामुळे वाहनावरचे नियंत्रण सुटले व समोर रस्ता ओलांडणाऱ्या मेंढ्या चिरडत बस पुढे थांबली.

Deola | देवळा नाशिक रस्त्यावर शॉट सर्किटमुळे चारा जळून खाक; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

यावेळी हि बस प्रवाशांनी भरलेली होती. या बसमधील प्रवाशांची सोय म्हणून येणारी बस (एमएच१४ केक्यु ०६५७) मध्ये प्रवासी चढत असताना अचानक मागुन येणाऱ्या कांद्याच्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने या कांद्याच्या ट्रकने या बसला मागुन धडक दिली. एवढ्यावरच हा अपघात थांबला नाही. तर पुढे विटांचा ट्रक (एमएच१५ इजी ५९६७) ला धडक दिल्याने हा ट्रक पल्टी झाला. स्थानिक नागरीकांनी शर्थीचे प्रयत्न करुन प्रवाश्यांना बाहेर काढले व वैद्यकीय सेवेसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या ठिकाणी आतापर्यंत अनेक वेळा अपघात झाले असून येथे काहीतरी विशेष उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. यावेळी देवळा तसेच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, कैलास गुजर, दामोधर काळे, चांदवडचे वाघ घटनास्थळी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here