आशापूरी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रियंका कोठावदे

0
54
येथिल आशापूरी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रियंका कोठावदे , उपाध्यक्षापदी प्रिती ठक्कर यांची अविरोध निवड प्रसंगी उपस्थित संचालक मंडळ (छाया -सोमनाथ जगताप)

देवळा प्रतिनिधी : येथिल आशापूरी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ. प्रियंका भुषण कोठावदे यांची तर उपाध्यक्षापदी सौ. प्रिती हेमंत ठक्कर यांची अविरोध निवड करण्यात आली. तर सौ.भारती योगेंद्र दुसाने यांची कार्यकारी संचालिका तसेच तक्रार निवारण व तडजोड समितीच्या अध्यक्षपदी सौ.अश्विनी पंकज आहेर यांची निवड करण्यात आली. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच अविरोध पार पडली होती.

येथिल आशापूरी महिला पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रियंका कोठावदे , उपाध्यक्षापदी प्रिती ठक्कर यांची अविरोध निवड प्रसंगी उपस्थित संचालक मंडळ (छाया -सोमनाथ जगताप)

निवडणूक निर्णय अधिकारी नितिन तोरवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षा व उपाध्यक्षा यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष पदासाठी सौ. प्रियंका भुषण कोठावदे यांचा तर उपाध्यक्षपदासाठी सौ.प्रिती हेमंत ठक्कर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. अध्यक्षपदासाठी सौ. चारुशिला जितेंद्र धामणे यांनी सुचना आणली. तर सौ. दिपाली किरण भिलोरे यांनी अनूमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी अर्चना योगेश वाघमारे यांनी सुचना आणली तर सौ. भारती योगेंद्र दुसाने यानी उनुमोदन दिले.

यावेळी बैठकीस नवनिर्वाचित संचालिका सौ.प्रतिभा संजय ब्राह्यणकार, सौ. छाया आनंदा निकम, सौ, अर्चना योगेश वाघमारे, सौ. चारुशिला जितेंद्र धामणे, सौ.दिपाली नंदकुमार जाधव,सौ. मानसी राहुल वाघमारे, सौ.पूनम जयंत अहिरराव, सौ. दिपाली किरण भिलोरे, सौ. श्वेता नितिन देवरे, सौ. स्वाती प्रदिप हिरे, आदी उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तथा देवळा मर्चंट बँकेच्या अध्यक्षा सौ. कोमल भारत कोठावदे. यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तर व्यवस्थापिका सौ. अनिता आहेर यांनी आभार मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here