Deola | भावडभबारी घाटात माल वाहतूक ट्रेलरच्या अपघातात एक मजूर ठार

0
41
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  देवळा भावडभबारी घाटातून देवळ्याचे दिशेने येत असलेल्या माल वाहतूक ट्रेलरचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने वाहनांवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एक मजूर ठार झाला असून वाहन चालकासह दोन जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, भावडबारी घाटातून देवळ्याच्या दिशेने येत असलेल्या लोखंडी खांब (गर्डर ) वाहतूक करणारा ट्रेलर क्रमांक (सी.जी.०४ एच.पी ६५७५) याचा घाटातील तीव्र उतारावर ब्रेक नादुरुस्त झाल्याने चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनापुढे व आजूबाजूला चालणाऱ्या वाहन धारकांना मोठ्याने आवाज देत बाजूला होण्याचे सांगत वाहनांवर नियंत्रण करीत असता सदर वाहन वेगाने जात असताना सुरू असलेल्या कॉंक्रिटीकरण रस्त्यावरील पुलाच्या कामावरून वाहन गेल्याने पुलावर काम करणारा कर्मचारी जखमी झाला व पुलाजवळ सदर अनियंत्रीत वाहनांच्या पुढे चालू असलेली एसटी पाहता समय सुचकता दाखवत वाहन चालकांने अनियंत्रित वाहन रस्त्याच्या कडेला मातीच्या ढिगाऱ्यावर नेल्याने मोठा अनर्थ टळला असून या अपघातात मृत झालेल्या मजुरचे नाव हे संतु भीम दुलम ( वय – २२) ह्या गंभीर जखमी झालेल्या मजुराचे निधन झाले आहे.

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला ‘तुतारी’

तर मनीष लोणीया (वय – ३०), संतोष कुमार लोनिया (वय – ३०) हे दोन जण जखमी झाले असून त्यांना देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. याकामी रस्ता कामावरील कर्मचाऱ्यांचे यंत्रणेसह सहकार्य लाभले. याबाबत देवळा पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी करीत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here