
देवळा : तालुक्यात संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. वाखारी येथे तेली समाज बांधवांनी मिरवणूक काढून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता . तर देवळा येथे संभाजी शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर , माजी नगरसेवक दिलीप आहेर, विरोधी गटनेते संतोष शिंदे , जितेंद्र आव्हाड युवा मंचचे जिल्हाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, सतीश सूर्यवंशी , नाना अहिरराव ,बागुल नाना आदी उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम