देवळा ; भावड बारी घाटात दरड कोसळली असून, मोठा दगड रस्त्यावर आला आहे . जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाणे याची दखल घेऊन, घाटातील अडथळा दूर करावा ,अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे . संपूर्ण जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून संततधार सुरू आहे . यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले .

बुधवारी (१३) रोजी पहाटेच्या सुमारास देवळा नाशिक राज्यमार्गावरील भावड बारी घाटात दरड कोसळण्याचा प्रकार घडला असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही . मात्र ,रस्त्यावर मोठा दगड येऊन पडलेल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. याची संबंधित विभागाने दखल घेऊन रस्ता वाहतुकसाठी मोकळा करून दयावा ,अशी मागणी वाहनधारकानी केली आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम