देवळ्यात नासिक सायकलिस्टस सदस्यांचे स्वागत

0
33
देवळा येथे नासिक सायकलिस्टस सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना अरुण पवार ,डॉ संजय निकम ,डॉ वसंतराव आहेर ,भगवान आहेर आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा ; जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताचे औचित्य साधुन नासिक सायकलिस्टस यांनी नासिक ते मांगीतुंगी अशी १२५ किमी सायकल राईड आयाेजित केली हाेती.

देवळा येथे नासिक सायकलिस्टस सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना अरुण पवार ,डॉ संजय निकम ,डॉ वसंतराव आहेर ,भगवान आहेर आदी (छाया – सोमनाथ जगताप )

देवळा सायकलिस्टच्या वतीने देवळा शिवतीर्थावर त्यांचे ढाेल ताशाच्या गजरात स्वागत करुन अल्पाेहाराची साेय करण्यात आली.

देवळा सायकलिस्टचे अध्यक्ष अरुण पवार , कार्याध्यक्ष डाॅ. संजय निकम, डाॅ. वसंतराव आहेर, डाॅ. नंदु आहेर, डाॅ. स्वप्निल आहेर, डाॅ. अनिल चव्हाण पंकज जाधव, राजु कानडे व भगवान आहेर यांनी गुलाबपुष्प, पाणी बाटली व ताक पाऊच देवुन स्वागत केले.

नासिक सायकलिस्टचे एकुण 108 सदस्य याच्यात सामिल झालेत. विशेष म्हणजे वयाची साठी पार केलेली अनेक सदस्य या सायकल फेरीत सहभागी हाेवुन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. या रॅलीत नासिक सायकलिस्टचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, उपाध्यक्ष किशोर माने, सेक्रेटरी मनीषा रौंदळ, डी सी पी संजय बारकुंड,अनुराधा नडे, नारायण वाघ, किशोर काळे,संजय पवार, अनिल कुमार सुपे, नलिनी कड, प्रविन पवार व इतर सायकलिस्ट सहभागी झाले हाेते.

“आजच्या डिजीटल युगात पर्यारवणाची हानी हाेणार नाहीत याची काळजी घेणे फार गरजेचे झाले आहे. सायकल चालवुन स्वताचे व पृथ्वीचे आराेग्य जाेपासणे काळाची गरज झाली आहे. नेहमीप्रमाणे आजच्या सायकल रॅलीत अनेक ज्येष्ठ व महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय हाेती.”
– संजय पवार
नासिक सायकिलस्टस, नासिक

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here