सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | राज्य सरकारकडून नुकतीच बंद करण्यात आलेली एक रुपयात प्रधानमंत्री पीकविमा योजना पुन्हा कार्यान्वित करावी. तसेच सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करून विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द पाळावा. यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवळा तालुका अध्यक्ष दत्ता पवार यांच्या नेतृत्वाखाली देवळा तहसील कार्यालय परिसरात शुक्रवारी (दि. ४) तीव्र आंदोलन छेडण्यात आले. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविली होती. मात्र, या योजनेत काही गैरप्रकार झाल्याने सरकारने ही योजना २० मार्च रोजी बंद केली आहे. या योजनेतील महत्त्वाचे चार घटक देखील सरकारकडून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांना लाभ मिळणार नसल्याने ती योजना पुन्हा कार्यान्वित करावी.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण न केल्याने ते पूर्ण करावे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकारणातील दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी. यांसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन सादर करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवळा तालुका अध्यक्ष दत्ता पवार, उपाध्यक्ष सचिन शेवाळे, प्रवीण निकम, तालुका संघटक आप्पा कुलकर्णी, भाऊसाहेब शेवाळे, निखिल शेवाळे, मच्छिंद्र कापडणीस, अंबादास कांदळकर, निलेश सूर्यवंशी, योगेश पाटील, गणेश निकम, मनोज निकम आदी मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम