देमको बँकेचे परिसराच्या आर्थिक विकासासाठी मोठे योगदान- विश्वास ठाकूर

0
45
देमको बँकेच्या वतीने येथील भूमिपुत्र व महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांचा सत्कार करताना उपाध्यक्ष डॉ प्रशांत निकम समवेत अध्यक्षा कोमल कोठावदे व संचालक मंडळ आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : बँक हि प्रोफेशनल पध्दतीने चालवली पाहीजे, केवळ सवंग लोकप्रियतेसाठी काम केले तर संस्था फार दिवस टिकत नाही. केवळ संचालकांवर दोषारोप करूनही प्रश्न सुटत नाहीत. वसुली करतांना सभासदांचीही जबाबदारी आहे, जो कोणी बँकेचे पैसे भरणार नाही त्यांनी बँकेचे पैसे भरलेच पाहीजेत याकरता सभासदांनी रेटा लावला पाहीजे,६१ वर्षापूर्वी स्थापन झालेल्या देमकोचे परीसराच्या आर्थिक विकासात मोठे योगदान आहे असे प्रतिपादन राज्य सहकारी बँक्स असो. अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले.

देमको बँकेच्या वतीने येथील भूमिपुत्र व महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांचा सत्कार करताना उपाध्यक्ष डॉ प्रशांत निकम समवेत अध्यक्षा कोमल कोठावदे व संचालक मंडळ आदी (छाया – सोमनाथ जगताप )

दि देवळा मर्चंटस को. ऑप. बँकेत आयोजित सन्मान सोहळयात ते बोलत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी उपस्थित होते.

देवळा येथे देमकोच्या सभागृहात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ति झालेले देवळयाचे भुमीपूत्र डॉ. विजय सुर्यवंशी व राज्य सहकारी बँक्स फेडरेशन व बँक्स असो.पदी निवड झालेल्या संचालकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. आमदार डॉ. राहुल आहेर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, महाराष्ट्र राज्य नागरी सह.बँक्स असो.अध्यक्ष तथा विश्वास सहकारी बँकेचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, संचालक राजेंद्र सुर्यवंशी, राज्य सहकारी बँक्स फेडरेशनचे संचालक शशीताई आहीरे, नानासाहेब सोनवणे, रत्नाकर कदम आदी सन्मानार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. गोरख निकम यांनी केले. भारत कोठावदे यांनी आपल्या प्रास्ताविकातून देमकोची स्थिती व उपक्रमांची माहीती दिली. यावेळी मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना डॉ. विजय सुर्यवंशी यांनी सहकारी बँका सक्षम होण्यासाठी नवीन निवड झालेल्या संचालकांना एक महिना बँकेच्या कामकाजाविषयी प्रशिक्षण बंधनकारक करून तो संचालक त्या पदासाठी पात्र होण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी शशीताई आहीरे, नाना सोनवणे, रत्नाकर कदम आदींनी आपले मनोगतातून देमकोला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी देमकोच्या अध्यक्ष कोमल कोठावदे, उपाध्यक्ष डॉ प्रशांत निकम, जनसंपर्क संचालक योगेश वाघमारे ,राजेश मेतकर, केदारनाथ मेतकर ,प्रमोद शेवाळकर,भगवान बागड,हेमंत अहिरराव, सुभाष चंदन ,नलिनी मेतकर, मनीषा शिनकर , अनिल धामणे , योगेश राणे ,मयूर मेतकर , अमोल सोनवणे ,तज्ञ संचालक भारत कोठावदे ,सचिन कोठावदे ,आदींसह सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.

देमकोची थकबाकी मार्च महिन्यापर्यंत निम्यावर आणण्यासाठी संचालक मंडळाने वसुलीसाठी कडक धोरण अवलंबत प्रयत्न करावा, नाशिक जिल्हा बँक असोशिएशन पाठीशी असल्याचे आश्वासन विश्वास ठाकूर यांनी देमकोच्या संचालक मंडळाला दिले.

१८ वर्षांपूर्वी जिल्हा उपनिबंधक म्हणून काम करत असतांना बघितलेला सहकार आजही तसाच आहे. लोकांच्या ठेवीतून लोकांना कर्जवाटप करून ती संस्था चालवायची हि किमया असून सहकाराची खरी ताकद आहे. परंतु यापुढे स्पर्धेत सहकार टिकून राहण्यासाठी संचालक मंडळाने काटेकोर अभ्यास, नियमांची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
– डॉ. विजय सुर्यवंशी,आयुक्त राज्य उत्पादन शुल्क

देवळा येथील सुराणा पतसंस्थेत सभासद भेटवस्तु वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. विजय सुर्यवंशी, विश्वास ठाकूर आंदीच्या हस्ते करण्यात आले.आमदार डॉ. राहुल आहेर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ.रमणलाल सुराणा, संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here