ठाकरे कुटुंबात फूट पाडण्यात शिंदे यशस्वी; ठाकरेंचे आमदार , खासदार आज फुटणार का ?

0
14

मुंबई: शिंदे यांच्या मेळाव्याला स्मिता ठाकरे यांची देखील उपस्थिती बीकेसी मैदानावर कार्यकर्त्यांची भक्कम गर्दी पाहायला मिळत आहे. दोन्ही मैदानावर शिवसेना गाण्याचे बोल घुमत असतांना आपल्याला सध्या दिसत आहेत.
‘मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही’ अशी शिंदे गटाची टॅग लाईन असून तर ठाकरे गटाची टॅग लाईन ‘मी माझ्या शिवसेनेला भाजपचे गुलाम होऊ देणार नाही’ अशी आहे.

शिंदे गटाच्या मेळाव्यात स्टेजवरील ‘ती’ विशेष खूर्ची कुणासाठी आहे?
बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा सभेच्या मंचावर खास खुर्ची लावण्यात आली आहे. या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवसेना नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत संजय राऊत यांच्यासाठी खास खुर्चीही ठेवण्यात आली होती.

उद्धव ठाकरे यांची दसरा सभा दादरच्या शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदे यांची दसरा सभा वांद्रे येथील बीकेसी मैदानावर होणार आहे. शिंदे यांच्या दसरा सभेला शिवसेनेचे आणखी 5 आमदार आणि 2 खासदार उपस्थित राहणार असल्याचा खुलासा खासदार कृपाल तुमाने केला आहे. याशिवाय शिवसेनेचे एक राज्यसभा खासदार आणि दोन लोकसभेचे खासदार भविष्यात शिंदे गटात सामील होतील, असे त्यांनी सांगितले आहे.

आज शिंदे यांच्याकडे येणार्‍या दोन खासदारांपैकी एक मराठवाड्यातील तर दुसरा मुंबईचा असल्याचा दावा कृपाल तुमाने यांनी केला. कृपाल तुमाने यांच्या वक्तव्यानंतर शिवसेनेत जाणारे ते दोन खासदार कोण? अशी चर्चा सुरू झाली. या चर्चेत दोन खासदारांच्या नावांची सर्वाधिक चर्चा आहे. यापैकी एक मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांचे नाव आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुंबईत गटनेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत गजानन कीर्तिकर यांनी भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्यास विरोध केला. त्यासोबतच शिंदे यांनी गजानन कीर्तिकर यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांची उपनेतेपदी निवड केली होती. एकनाथ शिंदेही गजानन कीर्तिकर यांच्या घरी पोहोचले. आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये एकनाथ शिंदे आणि संजय जाधव यांची भेट झाली होती.सध्या आव्हाड ठाकरेंच्या 50 पैकी 15 आमदार उरले आहेत, तर 40 आमदार आधीच शिंदे गटात सामील झाले आहेत. उद्धव ठाकरेंकडे आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, रवींद्र वायकर, प्रकाश फत्तरपेकर, संजय पोतनीस, नितीन देशमुख, वैभव नाईक, भास्कर जाधव, कैलास पाटील, सुनील राऊत, रमेश कोरगावकर, अजय चौधरी, राजन साळवी हे आमदार आहेत. राजन साळवी यांनी रिफायनरीबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्व राजन साळवी यांच्यावर नाराज होते. राजन साळवी यांनीही ठाकरे यांना पाठिंबा देण्याचे सोडणार नसल्याचे स्पष्ट केले होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here