Jharkhand : झारखंडमधील धनबादमध्ये १७ वर्षीय दलित विद्यार्थिनीच्या कथित आत्महत्येनंतर तेथील एका शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापकाला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
या घटनेनंतर जिल्हा उपायुक्तांनी चौकशीसाठी प्रशासकीय समिती स्थापन केली आहे.
धनबादचे एसएसपी संजीव कुमार यांनी बीबीसीला सांगितले की, “या प्रकरणात, ‘आत्महत्येसाठी प्रवृत्त’ या कलमांखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी अल्पवयीन असल्याने, बाल न्याय कायदा देखील जोडण्यास सांगितले आहे. ”
विद्यार्थिनीची सुसाईड नोट तपासण्यासाठी तिच्या हस्ताक्षराचा नमुना तपासण्यात येत आहे.
Eco friendly cremation : इथे मरणाचे सरण हि देऊन जाते पर्यावरण संवर्धनाच संदेश
सुसाईड नोटमध्ये काय लिहिले होते?
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये विद्यार्थिनीने स्थानिक तेतुलमारी पोलीस ठाण्याचे प्रभारी यांना उद्देशून लिहिले की, “आज शाळेत एका शिक्षकाने सर्वांसमोर मला कानसुळीत मारली, संपूर्ण शाळेसमोर माझा अपमान केला आणि मला हाकलून दिले. शाळेचा हा अपमान मला सहन होत नाहीये.”
नोटमध्ये शिक्षिकेचे नाव सिंधू मॅडम आणि मुख्याध्यापकाचे नाव आरके सिंग असे लिहून आत्महत्येला शिक्षक जबाबदार असल्याचे सांगण्यात आले आहे.
माझ्या मृत्यूनंतर सिंधू मॅडम यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, असे विद्यार्थिनीने लिहिले आहे.
जिल्हा उपायुक्त संदीप सिंह यांनी एका वृत्तवाहिनेला दिलेल्या माहितनुसार, विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी एफआयआर दाखल करण्यासोबतच जिल्हास्तरीय प्रशासकीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
चौकशी करणाऱ्या या समितीला विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त मुलीच्या वर्गमित्राची बाजू जाणून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे प्रकरण 10 जुलैचे आहे जेव्हा सेंट झेवियर्स शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. वंदना देवी या विद्यार्थिनीची आई म्हणाली, “माझी मुलगी तिच्या अतिरिक्त इंग्रजी वर्गासाठी सकाळी सात वाजता शाळेत गेली होती.”
विद्यार्थिनीचा भाऊ राजीव बौरी म्हणाला, “शाळेत जाताना मी दीदींना एका ठिकाणी रडताना पाहिले. मी विचारले असता, तिला आईला घेऊन ये, असे सांगण्यात आले.”
वंदना देवी सांगतात, “माझ्या मुलीने मला सांगितले की, ती रात्री तिच्या कपाळावर लावलेली टिकली काढायला विसरली आणि शाळेत गेली. शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी सिंधू मॅडमने त्या टिकलीवर आक्षेप घेतला आणि सर्व विद्यार्थ्यांसमोर माझ्या मुलीच्या दोन कानसुळीत मारल्या.”
त्या पुढे म्हणाल्या की, “यामुळे दुखावलेली माझी मुलगी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार करायला गेली. पण मुख्याध्यापकांनी तिला बॅग घेऊन यापुढे या शाळेत येऊ नकोस असे बोलून शाळा सोडण्यास सांगितले ”
Nashik – आई रागावते म्हणून तिघी मैत्रिणींनी घर सोडले ; पुढे नेमकं काय घडलं?
“हे समजल्यानंतर मी शाळेचे मुख्याध्यापक आरके सिंह यांच्याकडे गेले आणि त्यांना विनंती केली की माझ्या मुलीला शाळेतून काढू नका मी सिंधूला शिक्षिकेची माफी मागण्यासही सांगितले.”
विद्यार्थिनीचा अपमान केल्याचा आरोप
वंदनादेवी म्हणाल्या, “मुख्याध्यापक म्हणाले, ‘तूम्ही काय अभ्यास करणार, तूम्ही खालच्या जातीच्या आहे, तुम्ही दुसऱ्याच्या घरी काम करतात, तिलाही तेच काम शिकवा.’ अशाप्रकारे अपमानित करून माझ्या मुलीला शाळेतून काढून टाकले.
वंदना देवी यांच्या म्हणण्यानुसार, “घरी आल्यानंतर माझी मुलगी स्तब्ध बसली होती. मी तिला समजावून सांगितले की तू तुझा शाळेचा ड्रेस बदल आणि काळजी करू नकोस, काहीतरी उपाय निघेल.
तिने कागदावर काहीतरी लिहायला सुरुवात केली.मी नीट बघितले आणि विचारले की मुलगी काय लिहित आहे?तिने उत्तर दिले की आई परीक्षेची तयारी करत आहे मला खेदाने वाटते की ती सुसाईड नोट होती हे मला माहीत नव्हते.माझे शिक्षण झाले असते तर मला समजले असते.
त्या सांगतात, “सकाळी दहाच्या सुमारास मी आंघोळ करून खोलीत आले तेव्हा मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेला दिसला त्यानंतर शेजारी आणि पोलिसांना याची माहिती दिली. मुलीच्या खिशातून हीच सुसाईड नोट सापडली.
काही महिन्यांपूर्वी वडिलांचे निधन
एक वर्षापूर्वी हनुमानगढी मोहल्ला येथे असलेल्या तीन खोल्यांच्या बीसीसीएलच्या घरात एक विद्यार्थिनी, तिचे वडील, आई, भाऊ, बहीण आणि आजी असे एकूण सहा जण राहत होते.
अकरा महिन्यांपूर्वी विद्यार्थिनीच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाले होते. वंदना देवी यांचा मुलगा राजीव म्हणाला, “माझे वडील बीसीसीएलचे कर्मचारी होते ब्रेन ट्यूमरनंतर त्यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. एक वर्षही झाले नाही, आता दीदीही निघून गेली आहे.”
बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे वंदना देवी मजूर म्हणून काम करू लागल्या.
राजीव म्हणतो की, वडिलांऐवजी मला हायस्कूल उत्तीर्ण झाल्यानंतर अनुकंपा तत्त्वावर बीसीसीएलमध्ये नोकरी मिळेल. पण दीदींच्या मृत्यूनंतर, मला या अभ्यासाचा तिरस्कार वाटतो, मी हायस्कूलचे शिक्षण कसे करू?”
राजीव पुढे म्हणतो, “त्या दिवशी मुख्याध्यापकांनी सहकार्य केले असते, तर माझ्या बहिणीनेही हायस्कूल पूर्ण केले असते, जे होऊ शकले नाही कारण आम्ही आर्थिक परिस्थिती बिघडल्यानंतर, माझ्या आणि बहिणींच्या शाळेची फी भरू शकलो नाही. सुमारे सहा महिन्यांची फी बाकी होती.
“यामुळे शाळेत आम्हा तिघांनाही शाब्दिक शिवीगाळ करण्यात आली. माझ्या बहिणीला याची किंमत तिच्या जीवाने चुकवावी लागली.”
मुख्याध्यापकांच्या पत्नीची प्रतिक्रिया?
सेंट झेवियर्स शाळेचे प्राचार्य आर के सिंग यांच्या पत्नी सुप्रिया सिंग या शाळेचे व्यवस्थापन पाहतात.
त्यांच्यानुसार, “शाळेचे नाव सेंट झेवियर्स आहे. लोक याला ख्रिश्चन मिशनरी शाळा मानत आहेत. लोकांना वाटते की ही ख्रिश्चन शाळा आहे, त्यामुळे त्या विद्यार्थिनीला टिकली लावल्याबद्दल शिवीगाळ करून मारण्यात आले आहे. पण माझे पती आणि मी हिंदू आहे.”
सुप्रिया सिंह यांच्या म्हणण्यानुसार, “प्रार्थनेदरम्यान सिंधूच्या शिक्षिकेने विद्यार्थिनीच्या मेकअपची चौकशी केली आणि सांगितले की सर्वांसाठी समान नियम आहेत. यावर विद्यार्थिनीने तिला सांगितले की, त्या वरिष्ठ वर्गशिक्षिका नाही, तुम्ही असे बोलू शकत नाही. या गैरवर्तनावर शिक्षकाने विद्यार्थिनीला शिक्षा केली. यानंतर विद्यार्थिनी कठोरपणे बोलू लागली, त्यानंतर मुख्याध्यापकांनी तिला पालकासोबत येण्यास सांगितले.
पुढे त्या म्हणतात, “विद्यार्थिनी तिच्या आईसोबत मुख्याध्यापकांकडे परत आली आणि शिक्षिकेला माफी मागायला सांगितली. यानंतर प्राचार्यांनी विद्यार्थिनीला समजावून सांगितले, तरीही ती ठाम राहिली, त्यानंतर मुख्याध्यापकांनी विद्यार्थिनीच्या आईला तिला अभ्यासासाठी घेऊन जाण्यास सांगितले.मग दोघी निघून गेल्या.
दरम्यान फी न भरल्याच्या कारणाने आपल्या मुलीचा छळ करण्यात आला आहे अस वंदना यांनी म्हणल आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम