देवळा : येथील दाजी पाटील नागरी सहकारी पतसंसंस्थेच्या चेअरमनपदी अशोक संतोष आहेर यांची तर व्हा चेअरमनपदी सौ . लता वसंतराव आहेर यांची निवड करण्यात आली . या पतसंस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली .निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी नितीन तोरवणे यांनी कामकाज बघितले .
आज बुधवार दि ७ रोजी सकाळी ११ वाजता नूतन चेअरमन ,व्हा चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती . यावेळी चेअरमन पदासाठी अशोक आहेर व व्हा चेअरमन पदासाठी सौ लता आहेर यांचा निर्धारित वेळेत प्रत्येकी एक एक अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी नितीन तोरवणे यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली .
यावेळी संस्थापक संचालक विजय नानाजी आहेर , किरण जिभाऊ आहेर ,कौतिक भामरे , शिवाजी वाळू जाधव , अनिता अशोक पवार , राकेश हिरामण आहेर , प्रवीण धर्मा चंदन , माजी संचालक डॉ वसंतराव आहेर , अतुल पवार , सचिव दत्ता आहेर आदी
उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम