रोहित्र दुरुस्तीचे लेखी आश्वासन; दहिवडच्या शेतकऱ्यांचे उपोषण मागे

0
28
दहिवड ता देवळा येथील शेतकऱ्यांना रोहित्र दुरुस्तीचे लेखी आश्वासन देतांना उपकार्यकारी अभियंता बी ए सुरवसे समवेत पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे , संजय दहिवडकर आदी शेतकरी ( छाया- सोमनाथ जगताप )

देवळा ; तालुक्यातील दहिवड येथील ग्रुप नंबर 21 वरील रोहित्र वारंवार नादूरूस्त बाबत आज शनिवारी ( १९ ) रोजी सकाळी शेतकऱ्यांनी देवळा येथे महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण होते. याची महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून , आज सायंकाळ पर्यंत सदरील रोहित्र दुरुस्तीचे तसेच नवीन रोहित्र बसवून देण्याचे लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिल्याने उपोषण माघे घेण्यात आले.

दहिवड ता देवळा येथील शेतकऱ्यांना रोहित्र दुरुस्तीचे लेखी आश्वासन देतांना उपकार्यकारी अभियंता बी ए सुरवसे समवेत पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे , संजय दहिवडकर आदी शेतकरी ( छाया- सोमनाथ जगताप )

याबाबत अधिक माहिती अशी कि , देवळा तालुक्यातील दहिवड येथील ग्रुप नंबर 21 वरील रोहित्र वारंवार नादूरूस्त होत असल्याने वेळेवर पिकांना पाणी देता येत नाही . परिणामी पिके करपू लागली आहेत. या रोहित्रावर शेती तसेच अनुदानित आश्रम शाळेसह घरगुती कनेक्शन आहेत. सदर रोहित्र वारंवार नादुरुस्त असते. याबाबत अनेक वेळा वीज वितरण कंपनीच्या कळवण येथील कार्यकारी अभियंता तसेच देवळा येथील कार्यालयाकडे सूचित करूनही उडवा उडवीचे उत्तरे मिळतात. यामुळे ग्राहक कदरून गेले.

रोहित्राची देखभाल व दुरुस्ती ची जबाबदारी विद्युत वितरण कंपनी स्वीकारत नाही. यामुळे शेतकरी बांधव गेल्या वर्ष दीड वर्षपासून वर्गणी जमा करून रोहित्र दुरुस्ती करतात . वीज वितरण कंपनी कोणत्या हेतूने आमच्याकडे वीज बिल मागणी करते. त्यांचा कर्मचारी सुद्धा सदरील रोहित्राकडे फिरकत नाही. शेतमालाला भाव नाही. शेतकरी आर्थिक संकटात असताना रोहित्र दुरुस्त होत नसल्याने अखेर शेतकऱयांनी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी ( १९ ) रोजी देवळा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले.

या उपोषणाची वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन उपोषण कर्त्यांना तात्काळ आजच सायंकाळ पर्यंत रोहित्र दुरुस्त करण्याचे व नवीन रोहित्र पंधरा दिवसात बनसुन देण्याचे उप कार्यकारी अभियंता बी ए सुरवसे यांनी लेखी आश्वासन दिल्याने उपोषण माघे घेण्यात आले. यावेळी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर , पोपट देवरे ,शांताराम देवरे ,संजय महिरे , दयाराम देवरे ,जिभाऊ अहिरे ,दीपक अहिरे ,भगवान अहिरे ,जगदीश अहिरे ,राजाराम देवरे आदी शेतकरी उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here