देवळा येथे दहीहंडी उत्सव; हाई झुमका वाली पोर” फेम कुमावत यांची उपस्थिती

0
35

देवळा : शहरात प्रथमच श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त न्यु एकता बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने बुधवार दि. ६ सप्टेंबर २०२३ रोजी शिवस्मारक, पाचकंदील परिसरात भव्य दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती केदा नाना मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष योगेश (नानु) आहेर यांनी दिली.

या कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दहीहंडी पूजन तसेच १८ पगड जाती धर्मीय जोडप्यांच्या हस्ते श्रीकृष्ण आरती व छत्रपती शिवराय आरती करून होणार आहे. यानंतर एस.के.डी. इंटरनॅशनल स्कुल चे विद्यार्थी श्रीकृष्ण थीम नृत्य सादर करतील. शालेय विद्यार्थी बाळगोपाळांची राधा-कृष्ण व सुदामा वेशभुषा स्पर्धा घेऊन विजेत्या बाळगोपाळांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान सटाणा, मालेगाव, चांदवड आणि देवळा येथील गोविंदा पथक हे थर लावून सलामी देतील, यात सहा थोरांपर्यंत सलामी देण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्या पथकाला भाजपा चे नाशिक लोकसभा निवडणूक प्रमुख तथा भाजपा माजी जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर यांच्याकडून २५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

दरम्यात तरूणाईला वेड लावणारे गीत “हाई झुमका वाली पोर” फेम विनोद कुमावत व राणी कुमावत हे या कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत. देवळ्यात प्रथमच इतका भव्य दिव्य दहीहंडीचा कार्यक्रम सादर होणार असल्याने तालुक्यातील जनतेने हा कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन नानु आहेर यांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here