ज्येष्ठ अभिनेत्री अशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

0
40

दिल्ली : केंद्र सरकारकडून दिला जाणारा भारतीय चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च मानाचा असा २०२० चा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर झाला आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी तशी घोषणा मंगळवारी केली आहे. येत्या शुक्रवारी दिल्लीत होणाऱ्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात आशा पारेख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी आशा भोसले, हेमा मालिनी, पुनम धिल्लों, उदित नारायण, टी. एस. नागभरण या पाच मान्यवरांच्या समितीने आशा पारेख यांची निवड केली आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी वयाच्या दहाव्या वर्षांपासून आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली असून सुमारे पन्नास वर्षे त्यांनी आपली कारकीर्द गाजवली. जवळपास ९५ पेक्षा जास्त चित्रपटांत त्यांनी काम केले असून यापैकी ‘दिल देके देखो’, ‘कटी पतंग’, ‘तिसरी मंजिल’, ‘बहारों के सपने’, ‘प्यार का मौसम’, ‘कारवाँ’ अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या आहेत. त्यामुळे हिंदी चित्रपटातील प्रभावी अभिनेत्रींपैकी एक म्हणून त्यांना ओळखल्या जातात. १९९२ मध्ये पारेख यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here