Dada Bhuse | भाऊसाहेब हिरे, व्यंकटराव हिरे, बळिराम हिरे, पुष्पाताई हिरे आणि त्यांच्यानंतर प्रशांत हिरे 2004 पर्यंत दाभाडी मतदार संघात हिरे घरण्याचेच वर्चस्व होते. हिरे घराण्याच्या 4 पिढ्यांनी दाभाडी मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. पण ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले. त्यांच्यासाठी कामं करायची सोडून त्यांनी आपलीच घरं भरण्याला प्राधान्य दिले. भारतात लोकशाही आहे आणि येथे प्रजा हीच राजा असते. हे कदाचित हिरे घराणे विसरले असल्याची आक्रमक भावना त्यावेळी दाभाडीच्या जनतेत होती आणि हाच आक्रोश मतपेटीत उतरला.
Dada Bhuse | ‘शेतकरीपुत्राला’ संधी देण्याचा निर्धार दाभाडीच्या जनतेने केला
तब्बल 2004 पर्यंत दाभाडी मतदार संघात हिरे घराण्याचे वर्चस्व होते. 5 मंत्री होऊन गेले. पण एकानेही जनतेसाठी काम करण्याची इच्छा दाखवली नाही. अखेर 2004 च्या निवडणुकीत हिरे घरण्याच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लावण्याचा आणि परिवर्तन घडवण्याचा निर्णय दाभाडीच्या जनतेने घेतला. कुठल्याही ‘राजपुत्राला’ संधी न देता जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या ‘शेतकरीपुत्राला’ संधी देण्याचा निर्धार दाभाडीच्या जनतेने केला.
Dada Bhuse | शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण असणारे नेतृत्व
शिवसेना-भाजप युती असल्याने त्या काळी दाभाडीची जागा भाजपच्या वाट्याला आली आणि प्रशांत हिरेंचे चुलत भाऊ प्रसाद हिरे यांना उमेदवारी मिळाली. प्रशांत हिरे यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली.तर, दादा भुसे यांनी कप-बशी निषाणीवर अपक्ष निवडणूक लढवली. हिरे घराणे डोईजड होत असल्याने शिवसेना-भाजपाच्या जिल्ह्यातील काही बड्या नेत्यांनी त्यावेळी उमेदवारांविरोधात बंड करत दादा भुसेंमागे ताकद उभी केली.
२००४ च्या निवडणुकीत दादा भुसेंना ६८,०७९ मतं मिळाली. तर, प्रशांत हिरे यांना ५९,०६२ आणि प्रसाद हिरे यांना १५,८१६ मतं मिळाली होती. ९,०१७ मतांच्या फरकाने प्रशांत हिरे यांचा पराभव करत दादा भुसेंनी दाभाडीत विजयाचा गुलाल उधळला आणि येथूनच हिरे घराण्याच्या राजकीय कारकीर्दीला उतरती कळा लागली. वर्षानुवर्षे एकाच घराण्याला पाठिंबा देणाऱ्या दाभाडीच्या मतदारांनी बदल घडवला आणि दादा भुसेंच्या रुपाने नवीन चेहरा मतदारांनी स्वीकारला. माजी मंत्री असलेल्या प्रशांत हिरे यांचा पराभव केल्याने दादा भुसे यांचे नाव राज्यभरात चर्चेत आले. राज्यात त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची सत्ता असल्याने त्यांना मंत्रीपदाची ऑफर देखील देण्यात आली. मात्र,दादांनी शिवसेनेशी आणि मालेगावच्या जनतेच्या विश्वासाशी कधीही गद्दारी केली नाही.
Dada Bhuse | अन् एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाने प्रस्थापितांना घरी बसवले…
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम