देवळा : येथील आ .डॉ दौलतराव आहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी संजय तानाजी आहेर यांची तर व्हा चेअरमन पदी , अशोक तारू आहेर, तर मानद कार्यकारी संचालक पदी प्रितेश नरोत्तम ठक्कर यांची निवड करण्यात आली. या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली .
आज गुरुवारी दि ८ रोजी दुपारी चार वाजता संस्थेच्याकार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निंबधक सुजय पोटे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. चेअरमन पदी संजय आहेर ,व्हा चेअरमन पदी अशोक आहेर तर मानद कार्यकारी संचालक पदी प्रितेश ठक्कर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
याप्रसंगी संचालक सर्वश्री वसंत भदाणे ,तन्वीर अशरफ मणियार ,तुषार यशवन्त शिरोरे ,सतीश रामदास सावळे ,रमेश सहादू गुजरे , सौ .मंगल संजय आहेर, सौ मालती कौतिक पवार ,मिलिंद कौतिक पवार ,मिलिंद पोपट राणे,मोहनदास पर्वत गवळी , व्यवस्थापक योगेश पाटील आदींसह कर्मचारी उपस्थित होते .
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार, आमदार डॉ राहुल आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, संचालक भाऊसाहेब पगार ,माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर ,अतुल पवार , उपनगराध्यक्ष अशोक आहेर, प्रवीण मेधने ,मुन्ना आहेर,नानू आहेर, भारत कोठावदे , योगेश वाघमारे, हर्षद भामरे आदींनी अभिनंदन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम