द पॉईंट नाऊ ब्युरो : नुपूर शर्मा यांच्या मुस्लिम प्रेषितांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने सुरू आहेत. आणि आता त्यात देशातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करून, मुस्लिमांची माफी मागा असे म्हटल्याचे समोर आले आहे.
मुस्लिम प्रेषितांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे भारतात बऱ्याच ठिकाणी निदर्शने सुरू आहेत. त्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. तर यावरून मलेशियातील हॅक्टिव्हिस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहणानंतर देशातील बहुतांश सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. या ग्रुपने जगभरातील मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक करण्याचे आवाहन केले होते. आणि त्यानंतर आता महाराष्ट्रात ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह बऱ्याच वेबसाईट हॅक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
मुस्लिम प्रेषितांबद्दल केलेले वक्तव्य संपूर्ण देशाला अशांत करत आहे. त्यात बहुतांश इस्लामिक देशांनी भारताकडे याबाबत निषेध व्यक्त केला होता. तर काहींनी भारताकडून निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्याची घोषणा देखील केली होती. आता या सायबर अटॅक नंतर काय पाऊले उचलली जातात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम