देवळा: देवळा तालुक्यात काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी डोके वर काढले आहे. कधी घरफोडी तर कधी बाईक चोरी प्रकरणी चोरटे जोमात आहेत. सरस्वतीवाडी येथे घरचे बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी कपाटातील सोन्याच्या ८८ ग्रॅम वजनाच्या ३ लाख ५२ हजारांच्या ऐवजांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीप्रकरणी देवळा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सरस्वतीवाडी येथील शेळके वस्ती येथे वास्तव्यास असनारे मीनाक्षी रामराम शेळके या बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्याची चार तोळ्याची १ लाख ६० हजार रुपये किंमतीची पोत,१ लाख २० हजार रुपये किंमतीची दीड तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या, १५ ग्रॅम वजनाची गळ्यातील ६० हजार रुपयांची सोन्याची चैन, तीन ग्रॅम वजनाच्या १२ हजार रुपयांच्या सोन्याच्या ६ अंगठ्या असा एकूण सोन्याच्या ८८ ग्रॅम वजनाच्या ३ लाख ५२ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला आहे. ही चोरीची घटना दि.१६ ते १९ ऑगस्ट यादरम्यान घडलेली असण्याची शक्यता आहे.
आज घरी आले असताना हा प्रकार उघडकीस आला. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात भादवि कलम ४५७, ४५४, ३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, पोलीस कर्मचारी चंद्रकांत निकम आदी करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम