पोटच्या लेकीसाठी बापच ठरला हैवान! वारंवार बलात्कार अन् मारहाण; अखेर मुलीचा मृत्यू

0
24
Rape Case
Rape Case

Crime News | नालासोपाऱ्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना नालासोपारामधून उघडकीस आली आहे. वडिलांनीच त्यांच्या 22 वर्षीय मुलीवर वारंवार बलात्कार केल्याचं समोर आलेलं आहे. मुलीच्या मृत्यूनंतर ही घटना उघडकीस आलेली आहे. मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.

Maharashtra | राज्याच्या काही भागात आज अवकाळी पाऊस; शेतकरी चिंचेत

नालासोपारा पश्चिम येथे राहणाऱ्या 22 वर्षांच्या मुलीवर तिचे वडिलच अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलगी क्षयरोगाने आजारी असतानादेखील तिच्यावर अमानुष अत्याचार सुरू होते. तिला सतत घरात डांबून ठेवणे आणि मारहाण करुन तिच्यावर बलात्कार केला जात होता. मुलीचे 54 वर्षीय वडिलच तिच्यावर अत्याचार करत असल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने नालासोपारा पोलिसांत दिली आहे.

पीडित मुलगी मागील 3 महिन्यांपासून क्षयरोगाने ग्रस्त होती. तिला 11 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल केलेले होते. अतिदक्षता विभागात तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर आईने धाडस एकटवत पोलिसांत तक्रार करण्याचे धाडस दाखवले आहे. वडिलांनी केलेली मारहाण आणि शारिरीक अत्याचारामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईने केलेला आहे. आईने केलेल्या आरोपांवरुन पोलिसांनी पित्याविरोधात गुन्हा दाखल करुनदेखील अटक केलेली आहे.

देवळा तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन

नेमकं काय घडलं? 

पीडित मुलीचे वडील वारंवार तिच्यावर बलात्कार करत होते. या प्रकाराबद्दल कुठेही सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही देत होते. तसंच, मुलीला जबरदस्ती घरात डांबून ठेवत आणि मारहाण करत होते. त्यामुळे पीडित मुलगी आणि तिची आई हा अत्याचार सहन करत होते. पण पीडित मुलीच्या वडिलांचा त्रास वाढतच जात होता. मध्यंतरीच्या काळात पीडिता गर्भवतीदेखील राहिली होती परंतु आरोपी पित्याने बळजबरी तिचा गर्भपातदेखील केला होता. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here