Crime News | वाघोलीतील एका लॉजवर प्रेमीयुगुलाने गळफास घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घडना उघडकीस आलेली आहे. प्रेमप्रकरणातून दोघांनीही आत्महत्या केल्याचं आता म्हटलं जात आहे.
Nashik | खा. गोडसेंची नौटंकी उघड; लोकसभा अध्यक्षाकडे राजीनामा दिलाच नाही
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील २० वर्षीय मुलीचे मूळचा अहमदनगरच्या असलेल्या २१ वर्षीय मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. दोघेही सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास लॉजवर आलेले होते. सायंकाळी सहा वाजता ते खोली सोडणार होते. मात्र वेळ झाल्यानंतरही ते बाहेर न आल्याने लॉजमधील कामगारांनी तरुणाच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
तरुणाने फोन न उचलल्याने कामगार खोलीजवळ गेले आणि त्यांनी दरवाजाची बेल वाजवली. तेव्हा दरवाजा बंद नसल्याचं कामगाराच्या लक्षात आलं. दरवाजा ढकलल्यानंतर आत दोघांनीही गळफास घेतल्याचं दिसुन आलं. लगेचच लॉजच्या कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली.
Rule Change| १ नोव्हेंबरपासून सामान्यांच्या बजेटवर होणार मोठा परिणाम…हे नियम बदलणार
तरुणी डीएमएलटीचे शिक्षण घेत होती. तर तरुण हा खासगी कंपनीत नोकरी करत होता. या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आलेली आहे. अधिक तपास लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरू करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम