क्रिकेट विश्वाला मोठा धक्का ! पंतचा मोठा अपघात, कार जळून खाक, पंत गंभीर जखमी

0
14

भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत रुरकी येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. पंत दिल्लीहून रुरकी येथील त्यांच्या निवासस्थानी येत असताना त्यांच्या कारला अपघात झाला. कारचे नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरवर आदळून आगीत रूपांतर झाले. मंगळूर कोतवाली भागात NH 58 वर हा अपघात झाला. सूत्रांच्या माहितीनुसार या घटनेत पंतचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.

अपघातानंतर 108 च्या मदतीने पंत यांना तातडीने रुरकी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले. पंत यांच्या कारचे जे चित्र समोर आले असून ते पाहून हा अपघात किती भीषण झाला असेल, याचा अंदाज येतो. पंतच्या दुखापतीची प्रकृती काय आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसून ते गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतला डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

गाडी रेलिंगला धडकली

मिळालेल्या माहितीनुसार, पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच देहात पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पंत यांची कार रेलिंगला धडकली आणि त्यानंतर कारने पेट घेतला. त्यांची कार नरसन शहरात पोहोचली असता ती अनियंत्रित होऊन रेलिंगला धडकल्यानंतर उलटली.

क्रिकेटपासून दूर असेल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. अशा परिस्थितीत तो दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहू शकतो. अलीकडेच त्याला टीम इंडियातूनही वगळण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी पंतला टीम इंडियात स्थान मिळाले नाही. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याच्या बातम्या आल्या होत्या आणि बीसीसीआयने त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे (एनसीए) रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. आता या घटनेनंतर पंतच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्याला लवकर परतणे कठीण वाटते.

मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पंत यांच्याविषयी माहिती मिळाली असून त्यांनी पंत यांच्या उपचारासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत आणि गरज भासल्यास एअर अॅम्ब्युलन्सचीही व्यवस्था करण्यात यावी असे म्हटले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here