दिल्ली – झिम्बाब्वेने टाऊन्सविले येथे झालेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ गडी राखून ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. विशेष म्हणजे, झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Historic win for Zimbabwe 🙌
Their first ever ODI victory against the hosts in Australia 👏#AUSvZIM pic.twitter.com/Z6gfI0dwSS
— ICC (@ICC) September 3, 2022
टाऊन्सविलेच्या मैदानावर झिम्बाब्वेचा कर्णधार रेगिस चाकाबावाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रेगिसचा हा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला आणि सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियाला एकामागोमाग झटके देत राहिला, आणि धावसंख्या ७२ वर ५ अशी होती. डेव्हिड वॉर्नर एका टोक सांभाळत असताना दुसऱ्या टोकाकडून त्याला साथ मिळाली नाही व संपूर्ण संघ ३१ षटकांत १४१ धावा करून ऑलआऊट झाला. झिम्बाब्वेकडून रायन बर्लेने ३ षटकांत १० धावा देत ५ बळी घेतले.
१४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने चांगली सुरुवात केली. सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली. मात्र, पहिली बळी मिळताच सलग बळी पडल्या आणि झिम्बाब्वे ७७ धावांपर्यंत ५ बळी गमावल्या. मात्र कर्णधार रेगिस चाकाबावा ३७ याने साजेशी खेळी करत झिम्बाब्वेला ३९ षटकांत ७ गडी गमावून लक्ष्य गाठले आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला. रायन बर्लेला सामनावीराने गौरविण्यात आले.
झिम्बाब्वेने तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना जिंकला खरा, पण ऑस्ट्रेलियाने सुरुवातीचे दोन सामने जिंकून मालिका २-१ ने आपल्या नावावर केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम