जळगाव : राज्यात कोरोनाच्या (Corona) नव्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात जळगाव त्यामध्ये हा रुग्णांचा अहवाल आल्याने खळबळ उडाली आहे. जळगावमध्ये (Jalgaon) सध्या १६ कोरोनाबाधित रुग्ण असून ते कोवीड रूग्णालयात (Hospital) उपचार घेत आहेत.
राज्यात गेल्या दोन ते तीन महिन्यात कोरोना जवळपास आटोक्यात आला होता. आता कोरोनाच्या नव्या लाटेत रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात देखील कोरोना बाधित आढळून येत आहेत. जिल्ह्यात सध्या १६ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहे. यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आतापर्यंत १ लाख ५१ हजार बाधित
जळगाव जिल्ह्यात मंगळवारी सहा कोरोना बाधित आढळून आले. यात भुसावळ तालुक्यातून ३, चोपडा तालुका- १, यावल- २ असे एकूण ६ बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख ५१ हजार ५७५ कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९ ६८ रूग्ण बरे होवून घरी परतले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम