Corona Alert | वाढत्या कोरोनामुळे पुन्हा मास्क वापरण्याचा सल्ला..!

0
24
Corona Alert
Corona Alert

Corona Alert | 2020 पासून देशात कोरोनाने चांगलाच कहर माजवलेला असताना मागील दिड वर्षापासून देशातील लोक मोकळा श्वास घेऊ बघत होते मात्र पुन्हा एकदा संपुर्ण देशभरात कोरोनाचा धोका वाढत असून कोरोनाचा नवीन व्हेरियंट JN.1 हा निदर्शनास आला आहे. भारातात या नवीन कोरोना व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत. या नवीन कोरोना व्हेरियंटचे केरळमध्ये ३०० रुग्ण झालेत तर महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

देशातया या नवीन कोरोना व्हेरियंटच्या (Corona Alert)  रुग्णाची संख्या 2,669 झाली असताना राज्यातील आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे. राज्यात या नवीन व्हेरिंयंटचा पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता. दरम्यान, आता मुंबईत मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला असून गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Malegaon News | …. यामुळे पालकमंत्र्यांनी मालेगावच्या जनतेची माफी मागावी

देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या पालिकेची वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यातच खबरदारी म्हणून आता मुंबईकरांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले असले तरी अजूनही राज्यात मास्कची सक्ती करण्यात आली नाही, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी स्पष्ट केलेले आहे.

आरोग्यमंत्री आणि राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक

देशातील तसेच महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली असून राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चर, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे तसेत रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले आहेत. आरोग्य मंत्री तानाजी सावंत आणि राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक ऑनलाईन माध्यमातून सुरू असून कोरोना लस न घेतलेल्या नागरिकांची यादी, रुग्णालयातील बेडची व्यवस्था, औषधांचा साठा तसेच इतर आरोग्य यंत्रणांचा आढावा या बैठकीतून घेतला जातो आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट JN.1 याने सध्या राज्याची चांगलीच चिंता वाढवली आहे.

Thackeray Brothers | ठाकरे बंधूंची भेट; कुठे अन् काय झाली चर्चा…वाचा सविस्तर

Corona Alert | महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणेने एका टास्क फोर्सची स्थापना करावी

राज्यातील कोरोनाचा वाढत्या प्रसाराचा आडावा घेत महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणेने एका टास्क फोर्सची स्थापना करावी तसेच त्यात तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात यावे. दरम्यान, कोविड सेंटर, विलगीकरण बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स याबाबत माहिती घ्यावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here