धर्मांतर येथे थांबत नाही..! ; ज्ञानेश्वर झाला ‘मोहमद शाहजाद’

0
28

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : भारतात मोठ्या प्रमाणात कट्टरतावाद्यांचा सुळसुळाट असून वेळोवेळी त्यांनी आपले नापाक मनसुबे साध्य करण्यासाठी भोळवट कुटुंबांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लिम धर्माचा स्वीकार करण्यासाठी पैसे आणि मुस्लिम मुलीशी विवाह लावून देण्याचे आमिष दाखवत बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातल्या मांडवा गावातील एका 35 वर्षीय तरुणाने मुस्लिम धर्मात प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणाने राजकीय वळण घेतले असून शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर नोटरी करून स्वखुशीने दुसरा धर्म स्वीकारल्याचे या तरुणाने 11 फेब्रुवारीला घोषणापत्र लिहिले होते. मात्र त्यानंतर लगेच 17 फेब्रुवारीला दुसरा नोटरी बॉण्ड तयार केला. ज्यामध्ये लग्न आणि पैशांचे आमिष दाखवून त्याला धर्म बदलायला लावल्याचे लिहिले आहे. यामुळे नेमकं धर्मांतरासाठी कुणाचा दबाव होता हे अद्याप समोर आलेले नाही.

या तरुणाच्या म्हणण्यानुसार आता आता जेव्हा त्याने धर्मांतरणाचे घोषणापत्र लिहिले तेव्हा त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती असं त्याने स्पष्टीकरण दिले नाही, त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक वळण मिळालयं.

काय आहे नेमकं प्रकरण….
मुस्लिम धर्माचा स्वीकार करण्यासाठी पैसे व मुस्लिम मुलीशी विवाह लावून देण्याचे आमिष दाखऊन बीड जिल्ह्यातील परळी च्या मांडवा गावात एका 35 वर्षीय तरुणाने मुस्लिम धर्मात प्रवेश केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शंभर रुपयांच्या बाँड पेपरवर नोटरी करून स्वखुशीने दुसरा धर्म स्वीकारल्याचे या तरुणाने 11 फेब्रुवारीला घोषणापत्र लिहिले असून नंतर लगेचच 17 फेब्रुवारीला दुसरा स्टॅम्प तयार केला आहे. ज्यामध्ये लग्न आणि पैशांचे आमिष दाखवत त्याला धर्म बदलायला लावल्याचे आढळले. या तरुणाच्या म्हणण्यानुसार आता आता जेव्हा त्याने धर्मांतरणाचे (Conversion) घोषणापत्र लिहिले तेव्हा त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती असं त्याने जाहिर केलयं, त्यामुळे या प्रकरणाला धार्मिक वळण मिळालयं.

ज्ञानेश्वरचा नावाच्या या तरुणाने नोटरी केलेल्या दुसऱ्या बॉंडमध्ये त्याने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने दुसऱ्या बॉंडमध्ये लिहिलं की, “आपण हिंदू धर्मातच असून 11 फेब्रुवारी 2022 रोजी माझी मानसिक स्थिती ठिक नसल्याचा गैरफायदा घेऊन आमीष दाखवत परळी व बीडच्या काही मुस्लिम नागरिकांनी तुला अडचणीतून सोडवतो, पैसे देतो आणि मुस्लिम मुलीसोबत लग्नही लावतो, असे आमिष दाखवून घोषणापत्र लिहून घेतल्याचे सांगितले आहे. तसेच मुस्लिम धर्माची तत्त्वे मान्य नसून, मी मुस्लिम धर्माचा कधीही अभ्यास केला नाही. माझे मोहंमद शाहजाद मनोहर असे नावही मी बदलले नाही व त्याबाबत गॅझेट प्रसिद्ध केलेले नाही.” असंही त्या बाँडमध्ये लिहिले आहे. हे प्रकरण तब्बल एक महिन्यांनी समोर आले आहे.

तरुणाच्या या धक्कादायक दाव्यामुळे हे प्रकरण गंभीर बनलं आहे. या तरुणाला कोणी धर्मांतरण करण्यास सांगितलं ? का सांगितलं ? त्या तरुणावर धर्मांतरण करण्यासाठी काही दबाव होता का ? बीडमध्ये धर्मांतरण करणारे रॅकेट सक्रीय तर नाही लांब? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here